Rupali Patil Thombre | ‘आम्ही जिजाऊच्या लेकी, ज्यांनी आमच्या भगिनींवर हात उचलला त्याचा हात गळ्यात बांधणारच’, रुपाली पाटील ठोंबरे यांचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rangmandir) येथे ‘अमित शहा (Amit Shah) आणि भाजपची (BJP) वाटचाल’ या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी आलेल्या स्मृती इराणी यांचा सत्कार सुरु असताना राष्ट्रवादीच्या (NCP) महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या महिलांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण (Beating) केली. यामुळे याठिकाणी जोरदार राडा झाला. यानंतर राष्ट्रवादीच्या महिलांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. या घटनेवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी भाजपवर टीका करत इशारा दिला आहे. आमच्या भगिनींवर हात उचलणाऱ्यांना करारा जबाब मिळेल, अशा शब्दात रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी इशारा (Warn) दिला आहे.

 

रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) म्हणाल्या, वैशाली नागवडे (Vaishali Nagwade) आणि महिला या स्मृती इराणी यांना निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गोंधळ घालून महिलांना मारहाण केली. त्यांनी आता आपली संस्कृती दाखवली आहे. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. नालायक, नीच लोकांनी महिलेवर हात उचलला, गंठण तोडले, मारहाण केली. ज्यांनी आमच्या भगिनींवर हात उचला त्याचा हात गळ्यात बांधणारच, आम्ही जिजाऊच्या लेकी करारा जबाब देंगे असं त्या म्हणाल्या.

विनयभंगाचा गुन्हा दाखल
भाजपच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये स्मृती इराणी यांना वाढत्या महागाई आणि घरगुती गॅसच्या किमतीबाबत राष्ट्रवादीच्या महिला निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांनी महिलांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
तसेच साडीचा पदर ओढून अश्लील हातवारे केले. याप्रकरणी विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Rupali Patil Thombre | those who raise their hands against our sisters will get an agreement warned ncp leader rupali thombre patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा