Rupali Thombare Patil | रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Thombare Patil | राष्ट्रवादीच्या नेत्या आणि विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार आणि महिला अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांना नियुक्ती पत्र दिले आहे. (Rupali Thombare Patil)

 

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय महिलाध्यक्षा फोजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या सर्वांना अभिप्रेत असणारे समाजकार्य, पक्षकार्य करुन संघटना बांधणीसाठी आपण प्रयत्नशील असावे, असे निर्देश यावेळी रुपाली पाटील यांना नियुक्ती पत्रात देण्यात आले आहेत.

 

तसेच पक्षाची बाजू प्रभावीपण मांडणे, महिलांच्याबाबतीत प्रश्नांना वाचा फोडणे,
तसेच महिला प्रश्नांविषयी जनतेत वेळोवेळी पक्षाची भूमिका मांडण्याचे निर्देश यावेळी पाटील यांना देण्यात आले आहेत.

 

Web Title :- Rupali Thombare Patil | Appointment of Rupali Thombre Patil as spokesperson of NCP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Prathamesh Parab | प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘त्या’ मैत्रिणीने केलेली पोस्ट चर्चेत

Riteish Deshmukh Ved | ‘वेड’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट 30 डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत

Saleem Malik-Wasim Akram | ‘तो’ मला नोकराप्रमाणे वागवायचा; पाकिस्तानच्या माजी कॅप्टनवर वसिम अक्रम यांचा गंभीर आरोप