Rupali Thombare Patil | रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले – ‘सूर्य तळपतील चंद्र झळकतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Thombare Patil | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आज पुणे दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वीच मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Thombare Patil) यांनी आपला सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा का दिला यावर रुपाली पाटील यांनी भाष्य केलं. पण मनसेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

 

सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय! असं देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रुपाली ठोबरे पाटील (Rupali Thombare Patil) पुणे महानगरपालिकेच्या (Pune Corporation) मनसेच्या माजी नगरसेविका होत्या. त्याचबरोबर मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला.

 

‘राज ठाकरे हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’
राज ठाकरे यांना पत्र लिहून रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी आपला राजीनामा दिला आहे. या पत्रात मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. आपले आशीर्वाद आणि श्री. राज ठाकरे हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावनाही त्यांनी या व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Rupali Thombare Patil | mns sandeep deshpande reaction over rupali thombre patil resignation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या बाणेर परिसरात ‘स्पा सेंटर’मध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

Multibagger Stocks | रू. 22 चा शेयर एक वर्षात झाला रू. 354 चा, 1 लाख रुपये झाले 16 लाखापेक्षा जास्त

Hide WhatsApp Typing Status | ‘व्हॉट्सअप’वर कुणालाही दिसणार नाही तुम्ही कधी करत आहात ‘Typing’, जाणून घ्या सोपी पद्धत

Mula-Mutha River Rejuvenation Project | मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या कामाची 650 कोटी रुपयांची निविदा मागविली

PM Kisan Scheme | 10 व्या हप्त्याबाबत समोर आली मोठी माहिती, जर तुमचा सुद्धा अडकला असेल जुना हप्ता तर अकाऊंटमध्ये येतील पूर्ण 4000 रुपये; जाणून घ्या