Rupali Thombare Patil | ‘राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपच्या दबावामुळे बदलले’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज ठाकरे पूर्वी असे नव्हते. त्यांचा स्वभाव अलीकडे फार बदलला आहे. भाजपच्या दबावामुळे राज ठाकरे बदलले आहेत, असे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) म्हणाल्या आहेत. राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना रूपाली पाटील (Rupali Thombare Patil) पंढरपुरात बोलत होत्या.

 

राज ठाकरे पूर्वी कधी असे नव्हते. ठाकरेशाही आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपणारे राज ठाकरे आता बदलले आहेत. भाजपच्या दबावामुळे त्यांची भूमिका बदलली आहे, असे मत रूपाली ठोंबरे पाटील यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शिवरायांचा अपमान जातीय राजकारणासाठी केला जात आहे. जातीय राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव वापरले जात आहे आणि या सर्वाची सुरुवात शरद पवार यांनी केली होती. शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. शाहू, फुले, आंबेडकर हीच नावे घेतात. शरद पवार महाराजांचे नाव का घेत नाहीत, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.

 

त्यांच्या या आरोपांवर रूपाली पाटील (Rupali Thombare Patil) बोलत होत्या.
सडेतोड महिला नेत्या म्हणून नावलौकिक असलेल्या रूपाली ठोंबरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात रूपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला होता.
त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांची नुकतीच पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Web Title :- Rupali Thombare Patil | ncp leader rupali thombre criticize mns chief raj thackeray in solapur know in detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Virat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर

Shweta Tiwari | श्वेता तिवारीने ‘तो’ फोटो शेअर करताच नेटकरी संतापले; म्हणाले लाज वाटते का…..

Nora Fatehi | अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा; सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव