Rupali Thombre Patil on Ketki Chitale | केतकी चितळेंच्या फेसबूक पोस्टवरुन रुपाली पाटील यांचा निशाणा; म्हणाल्या – ‘महिला असली तरी छपरीच तू..’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Thombre Patil on Ketki Chitale | अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याविषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यानंतर आता केतकी चितळे ट्रोल होताना दिसत आहे. अनेकजण केतकी चितळेवर टीका केली आहे. शरद पवार यांच्याविषयी केलेल्या फेसबूक पोस्टवरुन (Facebook Post) आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Rupali Thombre Patil on Ketki Chitale)
केतकी चितळेने फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय ?
तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा
ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक
सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे
समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप
ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर
भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा
खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड
याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड
शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कष्टकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना सांगणारी कविता म्हटली आहे. त्या कवितेत पवारांनी हिंदू देवतांचे बाप काढल्याची टीका भाजपने केली होती. भाजपच्या टीकेला राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं. पवारांच्या याच कवितेचा धागा पकडून अभिनेत्री केतकीने शरद पवार यांना ब्राह्मणद्वेष्टा म्हटलं आहे. ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू, तू तर मच्छर, अशा खालच्या शब्दात तिने पवार यांच्यावर टीका केली.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी प्रतिक्रिया देत. अभिनेत्री केतकी चितळेवर हल्लाबोल केला आहे.
”चि चि चवताळीस बाई तू
महिला असली तरी छपरीच तू
संस्कार नसलेली केतकी,
इतकीशी कशी चवताळीस
हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहिजे.
कशात ना मशात केतकीबाई तमाशात,
लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला, मिळणारच बाई तुला चोप”
#सडकी #केतकी #चितळे
Web Title : Rupali Thombre Patil on Ketki Chitale | ncp leader rupali thombare patil critisized on actress ketaki chitale about sharad pawar facebook post
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर