तुमचं ATM कार्ड देईल तुम्हाला वाईट वेळी साथ ! मिळतील 10 लाख रूपये, जाणून घ्या यासंबंधीच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण सगळेच नेहमी पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डचा वापर करत असतो. मात्र आपल्या सगळ्यांना हे माहित नसेल कि, आपण ज्या RuPay कार्डवरून पैसे काढतो त्यावर आपल्याला दहा लाख रुपयांचा मोफत विमा मिळतो. भारतातील कोणत्याही बँकेत तुम्ही खाते उघडले असता तुम्हाला हा लाभ मिळतो. मोदी सरकारने ऑनलाईन व्यवहारांना चालना मिळण्यासाठी आणि डिजिटल व्यवहार वाढण्यासाठी याची सुरुवात केली आहे. 2014 मध्ये सर्वात आधी RuPay कार्डची सुरुवात करण्यात आली होती. एनपीसीआय देशभरातील RuPay कार्डचे व्यवस्थापन करत आहे. या कार्डचा वापर भारतासह दुसऱ्या देशात देखील केला जात असून याचा वापर भारतातील मोठ्या प्रमाणात नागरिक करत आहेत.

सध्या या RuPay कार्डचे पाच व्हेरियंटस उपलब्ध असून यामध्ये रूपे क्लासिक डेबिट कार्ड, रूपे क्लासिक क्रेडिट कार्ड, रूपे प्लेटिनम डेबिट कार्ड, रूपे प्लेटिनम क्रेडिट कार्ड आणि रूपे सेलेक्ट क्रेडिट कार्ड यांचा समावेश आहे.

काय आहे RuPay कार्ड

रुपया आणि पे यावरून RuPay हा शब्द तयार करण्यात आला आहे. सध्या आपण वापरात असलेल्या विजा आणि मास्टर कार्ड हे विदेशी असून RuPay कार्ड हे भारतीय आहे. यासाठी भारतीयांना विदेशी कंपनीला पैसे द्यावे लागतात. मात्र भारताकडे देखील सर्व सुविधा उपलब्ध असल्याने भारताने स्वतःचे कार्ड सुरु केले आहे.

मोफत आहे 10 लाख रुपयांचा विमा

हे कार्ड घेतल्यास तुम्हाला यावर 10 लाख रुपयांचा मोफत विमा मिळतो. यामध्ये व्यक्तीचा अपघात झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्याला सरंक्षण देतो. एसबीआय आणि पंजाब नॅशनल बँकांसारख्या मोठ्या बँका RuPay कार्ड तुम्हाला उपलब्ध करून देत असतात. या विमामध्ये तुमचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास तुम्हाला हि भरपाई मिळणार आहे. यामध्ये क्‍लासि‍क आणि प्रीमि‍यम असे दोन प्रकारचे कार्ड मिळत असून क्लासिक कार्डवर तुम्हाला 1 लाख रुपयांचा विमा मिळत असून प्रीमियम कार्डवर 10 लाख रुपयांचा विमा मिळतो.

आरोग्यविषयक वृत्त-