Rupee against Dollar | भारतीय चलनामध्ये लागोपाठ चौथ्या दिवशी जबरदस्त ‘उसळी’, डॉलरच्या तुलनेत 29 पैशांची वाढ; 4 सत्रात 124 पैशांची ‘तेजी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rupee against Dollar | डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपया (Rupee against Dollar) मध्ये आज म्हणजे 31 ऑगस्ट 2021 ला लागोपाठ चौथ्या व्यवहाराच्या दिवशी जबरदस्त वाढ नोंदली गेली. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 29 पैशांच्या जबरदस्त मजबूतीसह बंद झाला.

 

रूपया 73.00 च्या स्तरावर बंद

भारतीय चलनाला स्थानिक इक्विटीज आणि परदेशी फंड इनफ्लोमधील मजबूत कल लाभला. इंटरबँक फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये आज सकाळी रुपया डॉलरच्या तुलनेत 73.26 च्या मजबूत स्तरावर खुला झाला होता. यानंतर दिवसभर 72.99 पासून 73.29 च्या दरम्यान व्यवहार करत राहिला. शेवटी भारतीय चलन (Indian Currency) कलाच्या तुलनेत चांगल्या वाढीसह 73.00 च्या स्तराच्या वर बंद झाले.

 

आशियातील सर्वात चांगली कामगिरी करणारे चलन बनले रुपया

रुपया मागील व्यवहाराच्या सत्रादरम्यान 73.29 च्या स्तरावर बंद झाला होता. रुपयात लागोपाठ चार सत्रापासून मजबूतीचा कल राहीला. या चार सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत 124 पैशांनी मजबूत झाला.

ते पुढे म्हणाले, यामुळे रुपया आशियाई चलनांमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारे चलन बनले आहे.
तसेच चीनी सरकारकडून नियामकीय सक्तीनंतर भारतात परदेशी चलन वाढण्याचा सुद्धा भारतीय चलनाला लाभ मिळत आहे.

 

सर्वोच्च स्तरावर पोहचले भारतीय बाजार

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये (Crude Oil Prices) आज सुद्धा घसरण नोंदली गेली आहे. ग्लोबल ऑईल बेंचमार्क ब्रेंट क्रूडच्या किमतीत 0.83 टक्केची घट नोंदली गेली.
आज ब्रेंट क्रूडची किंमत 72.80 डॉलर प्रति बॅरलवर पोहचली.
भारतीय शेयर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा संवेदी निर्देशांत सेन्सेक्स (Sensex) 662.63 अंकाच्या तेजीसह 57,552.39 वर बंद झाला.

 

शेयर बाजारात जोरदार खरेदी

तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा संवेदी निर्देशांक निफ्टी 201.15 अंक म्हणजे 1.19 टक्केच्या तेजीसह 17,132.20 च्या स्तरावर बंद झाला.
एक्सचेंजच्या आकड्यांनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी सोमवारी भारतीय शेयर बाजारात जोरदार
खरेदी केली आणि शुद्ध खरेदीदार (Net Buyers) बनले. त्यांनी या दिवशी 1,202.81 कोटी रुपयांच्या शेयरची शुद्ध खरेदी केली.

Web Title : Rupee against Dollar | rupee today spiked 29 paise against dollar and 124 paise in 4 sessions know new level of indian currency

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update