Rupee Bank | रूपी बँकेच्या 4.96 लाख ठेवीदारांना डिसेंबरपर्यंत मिळणार 5 लाख रूपयांपर्यंतच्या ठेवी, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रुपी सहकारी बॅंकेच्या (Rupee Bank) ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठ वर्षाहून अधिक काळ ठेवींच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ठेवीदारांना त्यांच्या पाच लाख रूपयांपर्यंतच्या ठेवी डिसेंबरपर्यंत मिळणार आहे. याचा लाभ चार लाख ९६ हजार ठेवीदारांना होणार आहे. दरम्यान, रुपी बँकेच्या (Rupee Bank) विलीनीकरणावर ठेवी परत करण्याचा कोणताही परिणाम होणार नाही असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून रुपी बँकेचे (Rupee Bank) विलीनीकरण होणार कि खासगीकरण होणार अशी चर्चा रंगली आहे. ठेवीदारांनी तर थेट केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंकेने धोरणात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची अशी मागणी केली आहे. मध्यंतरी ठेव विमा महामंडळाकडून Deposit Insurance and Credit Guarantee Corporation (DICGC) बॅंकेच्या पाच लाख ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत ठेवीदारांनी अर्जासोबत केवायसी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे बहुतांश ठेवीदारांनी त्यांचे केवायसी (KYC) अर्ज जमा केले असून ते ‘डीआयसीजीसी’कडे पाठविले आहेत. त्यामुळे लेखापरीक्षणानंतर ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत दिल्या जाणार असल्याचे बँकेने सांगितले.

Shivajirao Bhosale Bank Fraud | शिवाजीराव भोसले बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात साताऱ्यातून आणखी एकाला अटक

एकीकडे ठेवी परत करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे मात्र, बॅंकेच्या विलीनीकरणाच्या पर्यायावर विचार व्हावा, अशी मागणी काही ठेवीदार करत आहेत, कारण बॅंक अवसायनात गेल्यानंतर पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांच्या ३७० कोटींच्या ठेवी बुडणार आहेत.

रुपी सहकारी (Rupee Bank) बँकेचे प्रशासक सुधीर पंडित म्हणाले की, ठेवीदारांना पाच लाखांपर्यंतची रक्कम परत करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी विमा महामंडळ लेखापरीक्षण पूर्ण करणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत ठेवी परत करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. ठेवी परत करणे आणि विलीनीकरण या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यामुळे ठेवी परत करण्याचा विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होणार नाही.

ठेवीदारांच्या याचिकांवर सुनावणी

उच्च न्यायालयात ठेवीदारांकडून रुपी बॅंकेसंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बॅंकेचे पुनरुज्जीवन किंवा सक्षम बॅंकेत विलीनीकरण करण्याबाबत तर, काही ठेवीदारांनी बॅंक अवसायनात काढण्याबाबत याचिका दाखल केल्या आहेत. याबाबत रिझर्व्ह बॅंकेच्या वकिलांनी त्यांचे म्हणणे डिसेंबरपर्यंत मांडावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

रुपी बॅंकेची मार्चअखेर स्थिती

ठेवी : १२९६ कोटी ७३ लाख रुपये

कर्जे : २९४ कोटी १५ लाख रुपये

हार्डशिप अंतर्गत ठेवीदारांना दिलेली रक्कम : ३७१ कोटी रुपये

हे देखील वाचा

Aryan Khan Drugs Case | ‘किंग’ खान ‘शाहरूख’कडे 25 कोटींची मागणी ! 18 कोटींवर डील झाली; NCB च्या वानखेडेंना 8 कोटी द्यायचे असं बोलणं सुरु होतं, ‘त्या’ बॉडिगार्डचा दावा

Narayan Rane | ‘…नाहीतर लोक बाजूच्या मंत्रालयात जातील आणि ते तर सध्या बंद आहे’

Chandrakant Patil | भाजपला हरवणे सोपे नाही, BJP चा राष्ट्रवादीला इशारा

 

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Rupee Bank | Rupee bank depositors will get back up to rs 5 lakh till december

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update