डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आणखी बळकट झाला आहे. रुपयाच्या मूल्यात गुरुवारी १५ पैशांची वृद्धी झाली असून रुपयाने ६९. ४५ असा नवा दर नोंदवला. डॉलरची स्थिती काहीशी कमजोर झाल्याने रुपयाची स्थिती सावरली. याशिवाय निर्यातदारांनी मोठ्या प्रमाणावर डॉलर विकल्याने रुपया वधारला.

आंतरराष्टीय बाजारपेठेत गुरुवारी अमेरीकी चलनात घसरण झाल्याने तसेच विदेशी गुंतवणुकीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया १५ पैशानी मजबूत होऊन ६९. ४५ रुपये प्रति डॉलरवर पोहचला. आंतरबँक मुद्रा चलनात गुरुवारी रुपया ६९. ४८ पातळीवर चलनात खुला झाला आणि मजबूत होऊन ६९. ४५ वर पोहचला.

मंगळवारी रुपया डॉलर ६९. ६० डॉलरवर स्थिर राहिला. महावीर जयंतीच्या निमित्ताने बुधवारी चलन बाजार बंद होता. कच्च्या तेलाच्या किमतीत ०. ०१ टक्क्यांनी घसरण होऊन दर ७१. ६१ डॉलर प्रति बॅरल राहिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like