Rupee vs Dollar | डॉलरच्या तुलनेत 82 रुपयांपर्यंत जाऊ शकतो रुपया, ‘ही’ आहेत कारणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rupee vs Dollar | येत्या काही दिवसांत डॉलर (Dollar) च्या तुलनेत भारतीय रुपयात (Indian Currency) आणखी घसरण दिसू शकते. अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाढती व्यापार तूट आणि यूएस फेडरल बँके (Federal Bank) च्या व्याजदरात (Interest Rate) झालेली वाढ, यामुळे येत्या काही दिवसांत रुपया आणखी घसरू शकतो. अर्थतज्ज्ञांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपया 82 रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. मात्र, फेडरल बँकेने अद्याप व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केलेली नाही. 26-27 जुलैच्या बैठकीत यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह 0.50-0.75 टक्क्यांनी व्याजदर वाढवू शकते, अशी अटकळ आहे. (Rupee vs Dollar)

 

फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्याने भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेतून परकीय भांडवल बाहेर जाण्याचा वेग वाढू शकतो. डॉलर काढणे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे रुपयाचे मूल्य आणखी घसरण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाने 80.06 रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. (Rupee vs Dollar)

 

पुढील वर्षी होऊ शकते सुधारणा
अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमतीतील स्थिरता आणि भू-राजकीय परिस्थितीत (Geopolitical) सुधारणा होण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी मार्चपर्यंत रुपया 78 रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर येऊ शकतो. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ सुनील कुमार सिन्हा यांनी पीटीआयला सांगितले की, एकंदरीत आम्ही असे मूल्यांकन केले आहे की डॉलरच्या तुलनेत रुपया 79 रुपयांच्या आसपास स्थिर राहू शकतो. हे संपूर्ण वर्षाचे सरासरी मूल्य असेल.

परदेशी गुंतवणूकदारांवर अवलंबून
आयसीआरएच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य शेवटी जागतिक धारणा आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओ (पीएफआय) प्रवाहावर अवलंबून असेल. यावरूनच ठरेल की, येत्या काही महिन्यांत रुपया आणखी घसरेल की, मंदीच्या शक्यतेमुळे अमेरिकन डॉलरची ताकद कमी होईल. नोमुराच्या मते, जुलै-सप्टेंबर तिमाहीत डॉलरच्या तुलनेत रुपया 82 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरू शकतो.

 

व्यापार तूट वाढण्याची शक्यता
क्रिसिलला आशा आहे की, नजीकच्या काळात रुपया दबावाखाली राहील आणि व्यापार तूट वाढल्यामुळे रुपया-डॉलर विनिमय दर अस्थिर राहील.
क्रिसिलच्या मुख्य अर्थतज्ज्ञ दीप्ती देशपांडे यांनी सांगितले की, आर्थिक वर्षाच्या अखेरीस दबाव कमी होऊ शकतो,
कारण कच्च्या तेलाच्या किमती खाली येण्याची अपेक्षा आहे.

 

कच्चे तेल, कोळसा आणि सोन्याच्या महागड्या आयातीमुळे जूनमध्ये व्यापार तूट विक्रमी 26.18 अरब डॉलवर पोहोचली.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-जूनमध्ये ही तूट वाढून 70.80 अरब डॉलर झाली आहे.

 

Web Title :- Rupee vs Dollar | indian rupee may further decline 82 rs against dollar due to trade deficit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravi Rana | ‘उद्धव ठाकरेंचं उरलेलं अस्तित्वही…’; रवि राणांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

 

Stock Market | Reliance चे गुंतवणुकदार झाले मालामाल, एका आठवड्यात इतक्या कोटीचा झाला फायदा

 

Chandrakant Patil’s Mother Passed Away | चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर, संघर्ष करायला शिवकवणारे मायेचे छत्र हरपले