डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाली आहे. डॉलरच्य तुलनेत रुपया आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीवर पोहचला आहे. रुपयाचा भाव  ७ पैशांनी कमी तर डॉलरचा भाव ६९ रुपये १२ पैशानी सुरु झाला आहे. इतकेच नव्हे तर सूत्रांच्या माहिती नुसार रुपयाचा भाव अजून खाली जाऊ शकतो. यामुळे सर्वसामन्यांना अडचणीला सामोरे जावे लागेल, याची शक्यता आहे.

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रुपयाचा दर काल (गुरुवार दि. २०) सर्वात कमी झाला होता. ४३ पैश्यांनी घसरलेल्या रुपयाचा भाव ६९ रुपये ०५ पैसे झाला होता. २९ मे नंतर झालेले रुपयाचे हे सर्वात जास्त अवमूल्यन होते.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रिझर्व्ह बँकेकडून चलन दराबाबत दखल घेतली जात नसल्याने रुपयाचा दर घसरत आहे.

[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b3e87890-8c02-11e8-9f4c-2f4bc13ac1d2′]

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचे अध्यक्षांनी डॉलरच्या दरात वृद्धी झाल्याने रुपयाचे अवमूल्यन झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेत व्याजदरांमध्ये हळूहळू वाढ करण्याचा इशारा दिला आहे. या कारणामुळेच इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत डॉलरचे मुल्य वाढले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर रुपयाच्या या विक्रमी घसरणीमुळे अनेक परिणामांना तोंड द्यावे लागणार आहे. भारतात ८० टक्के पेट्रोलियम उत्पादने आयात केली जातात. रुपयाचा दर घसरल्याने तेल कंपन्या पेट्राेल -डिझेलच्या किंमती वाढवतील. याचा फटका सर्वसामन्यांना बसणार आहे.डिझेलचे भाव वाढल्याने मालवाहतूक महाग होईल परिणामी महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याशिवाय  भारतात मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि डाळ आयात केली जाते. रुपयाचा भाव घसरल्याने खाद्य तेल आणि डाळ महाग होईल.

विशेष म्हणजे  या वर्षात सातत्याने रुपयाची घसरण सुरु आहे. २०१७ मध्ये ७ टक्क्यांहून जास्त रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. यापूर्वी २०१३ मध्ये रुपयाचा भाव ६८.८० इतक्या खाली आला होता. त्यानंतर आता तो सर्वात कमी झाला आहे.