Video : बॉलिवूडच्या सिंगरचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा ! भावूक होत म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन असंच सुरू राहिल आणि आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेश मार्ग बंद करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याला अनेक सेलेब्सनंही पाठींबा दिला आहे. फेमस सिंगर रुपिंदर हांडा (Rupinder Handa) हिनंही याला पाठींबा दिला आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन पाहून रुपिंदर भावूक झालीय. सध्या तिची एक पोस्ट सोशलवर चर्चेत आली आहे.

रुपिंदरनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिनं शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आहे. रुपिंदर म्हणते, शेतकरी एकता जिंदाबाद. शेतकऱ्यांचं हे आंदोलन पाहून मी भावूक झाले आहे. या ठिकाणी 70-80 वर्षांचे आजी आजोबाही आहेत. त्यांच्या उत्साहाला आणि संघर्षाला सलाम. अशा धाडसी समाजात माझा जन्म झाला आहे याचा मला अभिमान आहे.

रुपिंदरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक युजर्सनी लाईक्स आणि कमेंट्स करत व्हिडीओ वर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे. सोशलवर चाहत्यांमध्येही रुपिंदरच्या याच व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. अनेकांनी तिचं व्हिडीओ पाहिल्यानंतर तिचं कौतुकही केलं आहे.

 

You might also like