आपल्या माघारी पत्नी काय करेल म्हणून केला 2 मुलांचा खून, बापाला खेड शिवापूर टोलनाक्यावर पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या पोटच्या दोन मुलांची हत्या करुन पळून जाणाऱ्या बापाला खेड शिवापूर टोलनाक्यावर आज पकडण्यात आले. चंद्रकांत अशोक मोहिते (वय ३७, रा. घाटकोपर, मुंबई, मुळ रा. रासाटी, कोयनानगर, सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याने गौरवी चंद्रकांत मोहिते (वय ११) आणि प्रतिक चंद्रकांत मोहिते (वय ७) यांची गळा दाबून हत्या केली आहे.

चंद्रकांत मोहिते हा दुर्धर आजाराने त्रस्त आहे. त्याचे पत्नीबरोबर वारंवार भांडणे होत होती. या कारणावरुन आपल्या मागे मुलांचे कसे होईल, यातून त्याने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. चंद्रकांत मोहिते हा गेल्या दोन दिवसांपासून मोटार घेऊन शिरुर तालुक्यात आला होता. त्यानंतर तो आपल्या मुळ गावी गेला होता. तेथून तो निघाला असताना त्याने आपल्या दोन मुलांची हत्या करुन तो पळून चालला असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळाली. त्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. ही माहिती त्यांनी राजगड पोलिसांना दिली.

पोलिसांनी खेडशिवापूर टोलनाक्यावर बंदोबस्त ठेवला. तो गाडीतून येताच त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले. तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला पकडले. गाडीत पाहिले असता दोघा मुलांचा गळा आवळून त्यांचा खुन केल्याचे दिसून आले आहे. शिरवळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुुरु आहे.

Visit : Policenama.com 

You might also like