अखेर ग्रामीण पोलिसांच्या बदल्यांचा वाद मिटला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून आयुक्तालयासाठी मनुष्यबळ मिळाले. मात्र यावेळी सध्या आयुक्तालयात आलेल्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातील कामात चांगले असणारे अधिकारी व कर्मचारी काढून घेण्यात आले. बदल्या झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोडू नये असे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांनी दिले होते . या सगळ्या प्रकारांमुळे पुणे ग्रामीणचे पोलिस अधिकारी संभ्रमावस्थेत होते. तर आपली नक्की कुठे नियुक्ती होणार या चिंतेत होते, पिंपरी-चिंचवडचे वरिष्ठ अधिकारी आपल्याला ग्रामीणकडून अधिकारी मिळतील या आशेवर होते. अखेर हा वाद मिटला आहे.
[amazon_link asins=’B005FYNT3G,B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’823e385a-b388-11e8-abcd-390f39e27e06′]

ग्रामीण पोलिसांकडून दोन पोलीस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक यांच्या बदल्या आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडुरंग कुंटे, राजेंद्रकुमार हिंदुराव राजमाने, सहायक निरीक्षक कुंदा नामदेव गावडे, अर्जुन गुरुदाल पवार, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, प्रदीप भक्त या सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या आज पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात केली आहे.

पुणे शहर आणि ग्रामीणचा भाग घेऊन तयार झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी सुरुवातीला २२०७ पदे मंजूर झाली आहेत. पैकी १८५५ ही पुणे शहर तर ३५२ ही पुणे ग्रामीण पोलीस दलातून वर्ग केली जाणार होती. यामुळे १४ ऑगस्टला रात्री आणि १५ ऑगस्टच्या पहाटे याची यादी निघाली. पुणे ग्रामीणमधून आलेल्या चाकण, आळंदी, तळेगाव एमआयडीसी, तळेगाव आणि देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी काढून इतर देण्यात आले.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ,B014PHNEOW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’882ec256-b388-11e8-bf73-195263e574ee’]

यातील दोन पोलीस निरीक्षक तत्काळ पुणे ग्रामीण मुख्यालयात हजर झाले. मात्र इतर अधिकारी, कर्मचारी हजर झाले नाहीत की त्यांना हजर होण्याचे आदेश मिळाले. संबंधीत पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी हा विषय वरिष्ठ पातळीवरील असल्याने तुम्ही पाहा असे म्हणून हात वर केले. त्यामुळे या अधिकारी, कमचाऱ्यांची ससेहोलपट सुरु होती. तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त, उपायुक्त यांनी या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आहे तिथेच काम करण्यास सांगितले होते. तसेच आम्हाला आहे त्याच पोलीस ठाण्यात काम करायचे असल्याचे त्यांनी लेखी अर्ज वरिष्ठांकडे दिले होते. ग्रामीणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणालाही सोडले नव्हते. उलट सर्वांचे याच ठिकाणी काम करायचे असल्याचे अर्ज घेण्यात आले होते.

या सगळ्या सावळ्या गोंधळावर अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशामुळे काहीशी शांतता निर्माण झाली होती. तरी देखील त्यांच्यावर टांगती तलवार होती. आज अखेर या सगळ्यांवर पडदा पडला. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी ग्रामीणच्या सहा पोलीस अधिकाऱ्यांची बदली पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात केली.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

You might also like