सर्वाधिक ‘विषारी’ असलेल्या सापानं दिला 33 पिल्लांना जन्म, फोटो झाला व्हायरल

कोईम्तूर : वृत्तसंस्था – सर्वात विषारी समजला जाणारा साप रसेल्स वायपरने कोईमतूर प्राणी संग्रहालयात 33 पिलांना जन्म दिला आहे. रसेल्स वायपर इतर सापांपेक्षा खुप वेगळा असतो. त्याची खासियत ही आहे की, तो एकावेळी 40 ते 60 पिलांना जन्म देऊ शकतो. प्राणी संग्रहालयाचे संचालक सेंथिल नाथन यांनी म्हटले की, नुकतेच आमच्या प्राणी संग्रहालयात, रसेल्स वायपर सापाने 33 सापांना जन्म दिला आहे.

सेंथिल नाथन यांचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी, आणखी एका सापाने 60 पिलांना जन्म दिला होता. यापूर्वी जूनमध्ये, रसेल्स वायपरला एका खासगी साप पकडणार्‍याने कोइम्तूरच्या बाहेरच्या भागातून एका घरातून रेस्क्यू केले होते. रसेल्स वायपर भारतात आढळणार्‍या सर्वात विषारी प्रजातीपैकी एक आहे, आणि सर्पदंशाच्या सर्वात जास्त घटनांना जबाबदार प्रजातीपैकी सुद्धा एक आहे.

प्राणी संग्रहालयाचे संचालक सेंथिल नाथन म्हणाले, यांना सांभाळणे खुप अवघड आहे, सर्व सापांना वनाधिकार्‍यांकडे सोपवले आहे. शिकार्‍यांमुळे ते सर्व जंगलात जिवंत राहू शकणार नाहीत.

कोइम्तूरच्या बाहेरील भागात राहणार्‍या एक व्यक्तीला शुक्रवारी तेव्हा धक्का बसला, जेव्हा त्याने आपल्या बाथरूमध्ये एक मोठा साप पाहिला. नंतर, कोविल मेडुच्या रहिवाशाने एका सर्पमित्राला बोलावले, त्याच्या टीमने येऊन रसेल्स वायपर असल्याचे ओळखले, जोसर्वात विषारी आहे. नंतर त्यास रेस्क्यू केले.

वन विभागची टीम विषारी साप रसेल्स वायपरच्या पिलांची चांगली देखभाल करत आहे. सर्व पिले निरोगी आहेत. रसेल्स वायपरने एकावेळी इतक्या पिलांना जन्म देणे हा एक शुभसंकेत आहे, असल्याचे सेंथिल म्हणाले.