दिलासादायक ! इंग्लंड आणि रशियानं बनवली ‘कोरोना’च्या विरोधातील ‘लस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्राणघातक कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आतोनात प्रयत्न करत आहे. या विषाणूवरील औषध किंवा लस तयार करण्यासाठी यूद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान,एक चांगली बातमी समोर आली आहे. इंग्लंड आणि रशियाने कोरोना विरोधातील लस तयार केली आहे. या दोन्ही देशांनी तयार केलेल्या लसीचे परिणाम अत्यंत सकारात्मक असल्याचे समजते.

माहितीनुसार, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने ही लस तयार केली असून 18 ते 55 वर्ष वयातील लोकांवर याचा प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ChAdOx nCoV-19 नावाचे हे औषध तयार करायला इंग्लंडच्या औषध प्राधिकरणाने मंजुरीही दिली आहे. या सोबतच रशियातील व्हेक्टर स्टेट व्हायरॉलॉजी अँड बायोटेक सेंटरमढील शास्त्रज्ञांनीही ही लस तयार केली आहे. जनावरांवर या लसीचे प्रयोग केले जात असून ती लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.

कधी पोहोचणार सामान्य नागरिकांपर्यंत –
ड्यूक युनिव्हर्सिटीचे प्रमुख जोनाथन क्विक यांनी सांगितले कि, तयार केलेल्या या लसीला सरकारची मंजुरी मिळाल्यानंरही तिचे रिअ‍ॅक्शन्स लक्षात घेणे महत्वाचे आहे.जगभरातील जवळपास सर्वच देशांत अशा प्रकारची लस तयार करण्यासाठी काम सुरू आहे. मात्र, ती किती सुरक्षित आहे हे सिद्ध झाल्यानंतरच ती लोकांपर्यंत पोहोचू शकेल. याचबरोबर याची किंमतदेखील तितकीच महत्वाची असेल. जर या लसीचे मूल्य जास्त असेल तर ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे अवघड होईल.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरात उच्छाद मांडला आहे. आतापर्यत 6,00,000 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला असून 27,370 हून अधिक लोकांचा मृत्यू झाली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे 1,33,373 लोक बरे झाले आहेत. भारतातही संक्रमित रुग्णांची संख्येत वाढ होत असून संक्रमित रुग्णांचा आकडा 800च्या वर गेला असून आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.