रशियाला नाही कुणाची पर्वा, सुरू केलं Sputnik-V ‘कोरोना’ वॅक्सीनचं उत्पादन

मॉस्को : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह पश्चिमी देशांच्या टीकेकडे दर्लक्ष करत रशियाने कोरोनाची वॅक्सीन स्पुतनिक-व्हीचे उत्पादन सुरू केले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, गमलेया विज्ञान संशोधन संस्थेने विकसित केलेल्या कोरोना वॅक्सीनचे उत्पादन सुरू केले आहे. अधिकार्‍यांनी म्हटले की, ते पुढील 12 महिन्यांमध्ये कोरोना व्हायरस वॅक्सीनचे 50 कोटी डोस बनवण्यास सक्षम आहेत. रशियन आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ही वॅक्सीन सर्व आवश्यक चाचण्यांमधून बाहेर पडली आहे आणि कोरोना व्हायरसविरूद्ध रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात यशस्वी ठरली आहे. ही वॅक्सीन दोन वेळा द्यावी लागते आणि अपेक्षा आहे की, ती व्हायरसविरूद्ध सुमारे दोन वर्षे रोगप्रतिकारशक्ती विकसित करेल.

ही वॅक्सीन 76 लोकांवर वेगवेगळी टेस्ट केली आहे. रशियन अधिकार्‍यांनी सांगितले की, या वॅक्सीनचे उत्पादन लवकरच परदेशातही सुरू होईल आणि युएई, सौदी अरब तथा फिलिपीन्समध्ये ट्रायल सुरू होत आहे. तिकडे, ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलच्या रिपोर्टनुसार, रशियन वॅक्सीन किती प्रभावी आणि सुरक्षित आहे याची तपासणी करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे, तर या वॅक्सीनचा साईड इफेक्टसुद्धा दिसून आला आहे. पुतिन यांनी म्हटले होते की, त्यांनी त्यांच्या मुलीला सुद्धा ही वॅक्सीन दिली आहे.

डब्ल्यूएचओने मागितली वॅक्सीनची पूर्ण माहिती
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, 38 वॉलंटियर्सलाच केवळ ही वॅक्सीन देण्यात आली आहे. वॅक्सीन दिल्यानंतर त्यांच्यात 144 प्रकारचे साइड इफेक्टचा दावा वृत्तपत्राने केला आहे. हे सुद्धा म्हटले आहे की, ट्रायलच्या 42 व्या दिवसापर्यंत 31 वॉलंटियर्समध्ये साइड इफेक्ट दिसून येत आहेत. या प्रश्नांवर रशियाने म्हटले आहे की, त्यांची वॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यांना सुमारे 20 देशांकडून या वॅक्सीनसाठी ऑर्डर सुद्धा मिळाली आहे. तिकडे, रशियन न्यूज एजन्सी फोटांकाचा दावा आहे की, वॉलंटियर्सच्या शरीरात दिसणार्‍या साइड इफेक्टची यादी मोठी आहे.