US Elections 2020 : मायक्रोसॉफ्टचा इशारा – रशिया, चीन आणि इराणी हॅकर्सच्या निशाण्यावर निवडणुका

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेची टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने एक इशारा जारी केला आहे की, रशिया, चीन आणि इराणशी संबंधीत हॅकर्स अमेरिकामध्ये आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपनीनुसार, हे हॅकर्स निवडणुक प्रक्रियेशी संबंधित लोक आणि गटांची हेरगिरी करत आहेत. मायक्रोसॉफ्टचा दावा आहे की, 2016 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत निवडणूक प्रचार प्रभावित करणारे रशियन हॅकर्स ग्रुप पुन्हा एकदा अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्टने एक वक्तव्य जारी करून म्हटले आहे की, हे अगदी स्पष्ट आहे की, परदेशी गटांनी निवडणुकीला निशाणा बनवण्यासाठी सक्रियता वाढवली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धक जो बिडेन दोघांचा निवडणूक प्रचार हॅकर्सच्या निशाण्यावर आहे. स्ट्रॉन्टियम गटाशी संबंधित रशियन हॅकर्सने रिपब्लिकन आणि डेमोक्रेट्सशी संबंधित 200 पेक्षा जास्त संघटनांना निशाणा बनवले आहे. स्ट्रॉन्टियम गटाला फॅन्सी बियर नावाने ओळखले जाते. हे सायबर हल्ला करणारे एक युनिट आहे, जे कथित प्रकारे रशियन लष्कराची गुप्तचर एजन्सी जीआरयूशी संलग्न आहे.

2016 सारखेच अभियान सुरू झाले
मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष टॉम बर्ट यांनी म्हटले, आपण 2016 मध्ये पाहिले, त्याच्याशीच मिळते-जुळते स्ट्रॉन्टियमने लोकांच्या लॉग-इन रेकॉर्डपोहण्यासाठी किंवा त्यांचे अकाऊंट हॅक करण्यासाठी एका अभियानाची सुरूवात केली आहे, अंदाजानुसार त्यांच्याबाबत गुप्त माहिती जमा करण्यासाठी किंवा त्यांचे ऑनलाइन ऑपरेशन बाधित करण्यासाठी हे सुरू आहे.

कंपनीनुसार चीनी हॅकर्सनी जो बिडेन यांच्या निवडणुकीच्या प्रचाराशी संबंधित लोकांना वैयक्तिकरित्या निशाणा बनवण्यास सुरूवात केली आहे, तर इराणी हॅकर्सने ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला निशाणा बनवले आहे. मात्र, मायक्रोसॉफ्ट कंपनीचा दावा आहे की, बहुतांश हल्ले अजूनपर्यंत यशस्वी झालेले नाहीत.

मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे की, चीनी हॅकर्सने बिडेन यांच्या प्रचाराशी संबंधित लोकांची वैयक्तिक ई-मेल अकाउंट आणि ट्रम्प प्रशासनाशी संबंधित एका माजी प्रमुख अधिकार्‍याच्या अकाऊंटला निशाणा बनवले आहे. जरिकोनियम नावाने प्रसिद्ध चीनी हॅकर्सच्या गटाने अंतरराष्ट्रीय मुद्द्यांशी संबंधित लोक, शिक्षण संस्था आणि धोरण आखणार्‍या संस्थांशी संबंधित लोकांना निशाणा बनवले आहे. याशिवाय फॉस्फरस नावाने प्रसिद्ध इराणी हॅकर्स गटाने मे आणि जूनच्या दरम्यान व्हाइट हाऊसच्या काही अधिकारी आणि ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराशी संबंधित काही अधिकार्‍यांच्या अकाऊंटपर्यंत पोहचण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.