रशियानं आमंत्रण न पाठविल्याने पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांची ‘बेईज्जती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना पुन्हा एकदा नाराजी स्विकारावी लागली आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडले आहे. रशियाने स्पष्ट केले की पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ईस्टर्न इकोनॉमिक फोरमसाठी आमंत्रित करण्यात येणार नाही. ही बैठक रशियात पोर्ट सिटी व्लादिवोस्टोकमध्ये होणार आहे.

पाकिस्तानी मिडियाने मागील आठवड्यात बातमी दिली होती की, इमरान खान यांना रशियांचे राष्ट्रपती पुतिन यांच्याकडून निमंत्रण मिळाले आहे. या वृत्तत सांगण्यात आले होते की, बिश्केक या बैठकीत पुतीन यांना पाकचे पंतप्रधान इमरान खान यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

रशियाच्या परराष्ट्रीय मंत्रालयाने सोमवारी यावर माहिती देत सांगितले आहे की, दक्षिण आशियांच्या मिडियामधून काही वृत्त येत आहेत, ज्यात सांगण्यात आले आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना व्लादिवोस्टोकमध्ये ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ईस्टर्न इकोनॉमिक फोरमच्या बैठकीत गेस्ट ऑफ ऑनर म्हणून बोलावण्यात आले आहे.

फोरमला जाणार पंतप्रधान मोदी –
फोरमच्या बैठकीत आमंत्रित नेत्यांच्या बाबत ची माहिती देण्यासाठी सोमवारी सांगिलतले की, आम्ही मंगोलियाचे राष्ट्रपती बटुलगा, भारताचे पंतप्रधान मोदी, मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांंना व्लदिवोस्टोक मध्ये बोलवण्यात आले आहे.

परदेशी गुंतवणूक वाढवणे –
एकूण मिळून, ३ देशांच्या पंतप्रधानांना आणि एका देशाच्या राष्ट्रपतींना फोरम मध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. २०१५ साली या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. ज्याचा उद्देश आहे की परदेशी गुंतवणूक वाढवणे. आता थेट रशियांनेच पाकिस्तानला या फोरमला उपस्थित राहण्यास कोणतेही निमंत्रण दिले नाही हे स्पष्ट केल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडला आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर