रशियाने वॅक्सीनच्या बाबतीत घाई करू नये, हे धोकादायक : WHO चा इशारा

पॅरिस : वृत्त संस्था – रशियाने कोरोना व्हायरसची वॅक्सीन बनवण्याच्या रेसमध्ये बाजी मारत मंगळवारी कोविड-19 ची वॅक्सीन बनवल्याची घोषणा केली. रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी घोषणा केली की, आम्ही कोरोनाची सुरक्षित वॅक्सीन तयार केली आहे. देशात रजिस्टर्ड सुद्धा केली आहे. मी माझ्या दोन मुलींपैकी एका मुलीला पहिली वॅक्सीन दिली आहे आणि तिला बरे वाटत आहे. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, आमच्याकडे रशियाने तयार केलेल्या कोरोना वॅक्सीनची माहिती नाही. डब्ल्यूएचओने रशियाला वॅक्सीनच्या बाबतीत घाई न दाखवण्याचे म्हटले आहे. तसेच रशियाच्या या कृतीला धोकादायक सुद्धा म्हटले आहे.

रशियाने वॅक्सीनचे नाव आपले पहिले सॅटेलाइट स्पुटनिकच्या नावावरून ठेवले आहे. रशियन स्वायत्त निधीच्या प्रमुखांचे म्हणणे आहे की, या वॅक्सीनच्या 1 अरब डोससाठी त्यांना 20 पेक्षा जास्त देशांकडून मागणी मिळाली आहे. तर डब्ल्यूएचओने म्हटले आहे, रशियाने त्यांना वॅक्सीन आणि टेस्टींगची कोणतीही माहिती दिलेली नाही.

डब्ल्यूएचओला या वॅक्सीनच्या तिसर्‍या टप्प्यातील टेस्टींगबाबत संशय आहे. संस्थेचे प्रवक्ता क्रिस्टियन लिंडमियर यांनी प्रेस ब्रीफिंगमध्ये म्हटले की, जर कोणत्याही वॅक्सीनला तिसर्‍या टप्प्यातील ट्रायलशिवाय तिच्या उत्पादनासाठी लायसन्स जारी केले गेले तर ते धोकादायक समजले गेले पाहिजे.

जागतिक आरोग्य संघटनेंतर्गत येणार्‍या पॅन-अमेरिकन हेल्थ ऑर्गनाशजेशनचे सहायक संचालक जरबास बारबोसा यांनी म्हटले की, माहिती मिळाली आहे की, ब्राझील वॅक्सीन बनवण्यास सुरू करत आहे. परंतु, जोपर्यंत आणखी ट्रायल पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे केले नाही पाहिजे.

त्यांनी म्हटले, वॅक्सीन बनवणार्‍या कुणालाही या प्रक्रियेचे पालन करायचे आहे की, वॅक्सीन सुरक्षित आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने तिची शिफारस केली आहे. मागच्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने रशियाला विनंती केली होती की, त्यांनी कोरोनाची वॅक्सीन बनवण्यासाठी जागतिक गाईडलाइनचे पालन करावे.

रशियाने म्हटले वॅक्सीन सुरक्षित
रशियन अधिकार्‍यांनुसार, वॅक्सीनला ठरलेल्या योजनेप्रमाणे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने आणि रेग्युलेटरी बॉडीचे अप्रूवल मिळाले आहे. ही वॅक्सीन सर्वप्रथम फ्रंटलाइन मेडिकल वर्कर्स, टीचर्स आणि जोखिम घेणार्‍यांना दिली जाईल. पुतिन यांनी म्हटले की, त्यांच्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसची अशी वॅक्सीन तयार केली आहे जी कोरोना व्हायरसच्याविरूद्ध उपयोगी आहे. या वॅक्सीनचे मनुष्यावर दोन महिन्यापर्यंत परिक्षण करण्यात आले आणि ती सुरक्षीत असल्याचे सिद्ध झाले.