COVID-19 Vaccine News : रशिया बनवणार ‘कोरोना’च्या वॅक्सीनचे 3 कोटी ‘डोस’, जगातील पहिली लस होणार ऑगस्टमध्ये ‘लॉन्च’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशिया यावर्षी देशांतर्गत स्तरावर प्रायोगिक कोरोना लसीचे ३ कोटी डोसचे उत्पादन करण्याची योजना तयार करत आहे, ज्यात एक कोटी ७० लाख परदेशात करण्याची क्षमता आहे. रशियाने अलीकडेच जाहीर केले आहे की, त्यांनी कोरोना विषाणूच्या लसीच्या दिशेने मानवी चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळेच इतर देशांच्या तुलनेत रशिया या शर्यतीत पुढे गेला आहे.

सर्वात पहिले लस देण्याचा दावा
रशियन शास्त्रज्ञांचा दावा आहे की, जगातील पहिली कोरोना व्हायरस लस ऑगस्टमध्ये लाँच होईल. गॅमलेई नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झांडर गिन्टसबर्ग म्हणाले की, कोरोना लस १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान लोकांना दिली जाईल. एका वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले कि खासगी कंपन्यांकडून सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.

याबाबत रशियाचा दावा आहे की, मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने जगातील पहिल्या कोरोना व्हायरस लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशन मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वादीम तरासोव म्हणाले की, व्हॉलेंटियर्सची पहिली बॅच १५ जुलै रोजी आणि दुसरी बॅच २० जुलै रोजी सोडण्यात येईल. क्लिनिकल चाचण्या गॅमलेई नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी येथे १८ जूनपासून सुरू झाल्या होत्या. लसीची पहिली मानवी चाचणी ३८ लोकांवर एक महिना चालली. हे परीक्षण याच आठवड्यात संपले. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की ते वापरणे सुरक्षित आहे आणि शरीराची प्रतिरक्षा प्रतिक्रियेला प्रवृत्त करते. मात्र त्या प्रतिसादाची शक्ती अद्याप स्पष्ट नाही. अनेक हजार लोकांचा समावेश असलेल्या टप्प्यातील तिसरे मोठे परीक्षण ऑगस्टमध्ये सुरू होणे अपेक्षित आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) चे प्रमुख किरील दिमित्रिक म्हणाले की, सध्याच्या निकालांच्या आधारे याला रशियामध्ये ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये अन्य काही देशांत हे मंजूर होईल असा आमचा विश्वास आहे. ही जगातील बहुधा पहिली लस आहे. जगभरात कोरोना महामारी रोखण्यासाठी १५० हून अधिक संभाव्य लस तयार करुन त्यांची चाचणी घेण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार कमीत कमी अंतिम टप्पा तिसर्‍या मानवी चाचण्यांमध्ये एक चीन आणि दुसरा ब्रिटनमध्ये विकसित केला जात आहे. रशिया आणि मध्य पूर्वच्या दोन देशांमध्ये लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

लवकरच बाजारात उपलब्ध होईल लस
सेचनोव्ह विद्यापीठात इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासेटॉलॉजी, ट्रॉपिकल अँड व्हेक्टर बॉर्न डिसीजचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव यांच्या म्हणण्यानुसार, मानवी आरोग्याच्या संरक्षणासाठी कोविड-१९ लस यशस्वीरित्या तयार करणे हा या संपूर्ण अभ्यासाचा हेतू होता. लुकाशेव म्हणाले होते की, सुरक्षेसाठी लसीच्या सर्व बाबी तपासल्या गेल्या आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी ही लवकरच बाजारात उपलब्ध होईल.

ड्रग्स आणि जटिल उत्पादनांच्या निर्मितीतही सक्षम आहे सेचनोव्ह
तारसोव म्हणाले की, सेचनोव्ह विद्यापीठाने केवळ शैक्षणिक संस्था म्हणूनच नव्हे तर वैज्ञानिक व तांत्रिक संशोधन केंद्र म्हणूनही कौतुकास्पद काम केले आहे. महामारीमध्ये ड्रग्ससारखी महत्वपूर्ण आणि जटिल उत्पादने तयार करण्यातही ते सक्षम आहे. आम्ही कोरोना लसीसह काम करण्यास सुरवात केली.

लसीबाबत जगातील परिस्थिती
कोरोनाची लस जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात संशोधन संस्था आणि फार्मा कंपन्या तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. १५५ संभाव्य लस आणि औषधे आहेत, जे विकासाच्या विविध टप्प्यातून जात आहेत. यापैकी २३ च्या मानवी चाचण्या सुरू आहेत. रशियाने अलीकडेच जाहीर केले आहे की, त्यांनी कोरोना विषाणूच्या लसीच्या दिशेने मानवी चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. मात्र अमेरिका, ब्रिटन, भारत, चीन आणि ऑस्ट्रेलिया अनेक संभाव्य लसींवर काम करत आहेत. भारतीय औषध कंपनी जाईडस कॅडिला यांनी म्हटले आहे की, कोविड-१९ लस तयार करण्यासाठी मानवी चाचण्या सुरू केल्या गेल्या आहेत. व्हॉलेंटियर्सला पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यासाठी कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचा डोस वेगवेगळ्या जागी दिला जात आहे.