EpiVacCorona : ‘कोरोना’ वॅक्सीनबाबत रशियानं दिली खुशखबर ! ट्रायलमध्ये मिळालं यश, जाणून घ्या कधी येईल लस

मॉस्को : वृत्तसंस्था –   ऑगस्टमध्ये जगातील पहिली कोरोना वॅक्सीन स्पुतनिक-व्हीची नोंदणी करून अनेक देशांना आश्चर्याचा धक्का देणार्‍या रशियाने दुसर्‍या वॅक्सीन बाबतही खुशखबर दिली आहे. एपिपॅक कोरोना नावाच्या या वॅक्सीनची सुरूवातीची ट्रायल यशस्वी ठरली आहे. सैबरिया येथील रशियाच्या टॉप सिके्रट विषाणू विज्ञान संशोधन केंद्र वेक्टरने एका वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली.

वेक्टरच्या मीडिया विभागाने वृत्तसस्था इंटरफॅक्सला सांगितले की, क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या दोन टप्प्यात वॅक्सीन यशस्वी ठरली आहे. एपिवॅक कोरोना वॅक्सीन कोरोना व्हायरसविरूद्ध परिणामकार आणि सुरक्षित आहे. क्लिनिकल ट्रायल दरम्यान रोगप्रतिकारशक्तीला ट्रिगर करणार्‍या पेप्टाइड्सच्या आधारावर या वॅक्सीनच्या प्रभावाबाबत अंतिम निष्कर्ष काढणे शक्य होईल.

रशियाचे आरोग्य मंत्री मिखाई मुराश्को यांनी याचा आठवड्यात राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांना म्हटले होते की, तीन आठवड्यात मंत्रालयाकडून वेक्टर इंन्स्टिट्यूटच्या वॅक्सीनला मंजूरी दिली जाऊ शकते. वेक्टर संस्थेने म्हटले की, नोंदणी झाल्यानंतर सैबेरियामध्ये पाच हजाार स्वयंसेवकांवर अंतिम क्लिनिकल ट्रायल होईल.

एपिवॅक कोरोना वॅक्सीन विकसित करणार्‍या वेक्टर संस्थेने म्हटले आहे की, सामान्य ट्रायलपेक्षा एक वेगळी ट्रायल सुद्धा होईल, ज्यामध्ये 60 वर्षांच्या वयापेक्षा जास्त वयाचे सुमारे 150 स्वयंसेवक सहभागी होतील. याद्वारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल की, वॅक्सीन ज्येष्ठांवर किती प्रभावी आहे. त्यांनतर 18 ते 60 वर्षांमधील 5000 स्वयंसेवकांवर प्लेसबो-नियंत्रित चाचणी होईल.

यापूर्वी आरआयए वृत्तसंस्थेच्या संदर्भाने हे सुद्धा वृत्त आले होते की, रशियाने दुसर्‍या वॅक्सीनची ह्यूमन ट्रायल पूर्ण केली आहे. रशियन राष्ट्रपती ब्लादिमीर पूतिन यांनी म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्याविरूद्ध उपयोगी असलेल्या दुसर्‍या वॅक्सीनची सुद्धा नोंदणी लवकरच केली जाईल. कदाचित याच महिन्यात मोठी बातमी येऊ शकते.

नोव्हेंबरपासून उत्पादन सुरू होण्याची शक्यता

एपिवॅक कोरोना दोन-दोन घटक वॅक्सीन आहे. पहिल्या आणि दुसर्‍या घटकांमध्ये 21 दिवसांचे अंतर असते. वृतानुसार, कंपनीने पहिल्या फेरीत 10 हजार डोस बनवण्याची योजना केली आहे. या वॅक्सीनचे उत्पादन नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.