Video : रशियातील मॉस्कोजवळील पावर स्टेशनमध्ये भीषण आग, ५० मीटर उंचीच्या ज्वलामुखी

मॉस्को : वृत्तसंस्था – रुसची राजधानी मॉस्कोजवळील एका वीज केंद्राला भीषण आग लागली आहे. रशियन वृत्तसंस्थेच्या माहितीनूसार या भीषण आगीच्या घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

https://twitter.com/adagamov/status/1149240108677308417

या घटनेचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात आग लागली आहे हे स्पष्ट दिसत आहे. ५० मीटर उंच आगीचे लोट पसरले आहेत. वीज केंद्रामध्ये असलेल्या उच्च दाबाच्या गॅस पंपांमध्ये आग लागली असल्याचे रशियन इमरजेंसी मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. त्याचा जवळच्या इमारतींमध्येही प्रभाव दिसून येत आहे.

घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या अनेक गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

१९९२ पासुन हे वीज केंद्र सुरु आहे. १०६८ मेगावॅट विजनिर्मीती करण्याची या वीज केंद्राची क्षमता आहे. रशियाची राजधानी मॉस्कोपासुन केवळ २० किमी अंतरावर मितशची पाॅवर स्टेशन आहे.

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय