‘मद्यधुंद’ प्रोफेसरच्या बॅगेत आढळले महिलेचे ‘कापलेले’ हात, पोलिस घरी पोहचले तर मिळालं बाकीचं ‘शरीर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका प्रसिद्ध रशियन इतिहासकाराने आपल्या पार्टनरचा खून केला असल्याची कबुली दिली आहे. हा प्राध्यापक आपल्या बॅगेत महिलेचे हात कापून नदीत फेकून देण्यासाठी चालला होता. मिळालेल्या माहितीनुसार ओलेग सोकोलोव हा प्राध्यापक यावेळी पूर्णपणे नशेमध्ये होता. यावेळी नदीत हाथ टाकण्यासाठी गेला असताना तो स्वतः नदीत पडला.

अध्यापकाला मिळाला आहे फ्रान्सचा पुरस्कार
जवळच उभ्या असलेल्या ड्राइव्हरने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तपासणी केली असता पोलिसांना प्राध्यपकांच्या घरी त्याची गर्लफ्रेंड असलेल्या अनास्तासिया येशचेंकोचे बाकी शरीर मिळाले. हे अध्यापक नेपोलियन बोनापार्टचे विश्लेषक आहे. त्यांना फ्रान्स कडून ‘लीजन दे ऑनर’ हा पुरस्कार देखील देण्यात आला होता. त्यांनी त्यांचा गुन्हा देखील मान्य केला असल्याचे वकिलांनी सांगितले. हे दोघेही तीन वर्षांपासून सोबत रहात होते.

घरातून जप्त केली अनेक हत्यार
अध्यापकांनी गर्लफ्रेंडला मारण्यासाठी बंदुकीचा वापर केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण त्यांच्या बॅगेत कापलेल्या हातांसोबत एक पिस्तूल सुद्धा मिळाले आहे. तसेच त्यांच्या घरातून पोलिसांनी शॉटगन, चाकू, एक कुऱ्हाड आणि काही काडतुसे जप्त केली आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like