रशियानं 59 वर्षानंतर जारी केलं जगातील सर्वात मोठ्या अण्वस्त्र चाचणीचं परीक्षण, हिरोशिमा स्फोटापेक्षा सुद्धा 3333 पट होता ‘शक्तिशाली’

मास्को : वृत्त संस्था – रशियाने जगातील सर्वात मोठ्या अणू चाचणीचा 59 वर्ष जुना व्हिडिओ जारी केला आहे. 30 ऑक्टोबरला करण्यात आलेल्या चाचणीत बॉम्बची ताकद अमेरिकेने हिरोशिमावर केलेल्या अणू स्फोटापेक्षा सुद्धा 3,333 पट जास्त होती. शीतयुद्धाच्या वेळी सोव्हिएत संघाने टेस्ट केलेल्या ‘इवान’ नावाच्या या अणू बॉम्बची ताकद जगामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व अणू स्फोटांमध्ये सर्वात शक्तिशाली आहे.

सुमारे 50 मेगाटनच्या या भयंकर अणू बॉम्बची चाचणी रशिया आर्कटिक (बॅरंट) समुद्रात करण्यात आली होती, जो पाच कोटी टन पारंपारिक स्फोटांच्या बरोबरीने फुटला होता. या अणू बॉम्बला रशियन विमानाने आर्कटिक समुद्रात नोवाया जेमल्याच्या वर बर्फात टाकला होता. या अणू बॉम्बबाबत पश्चिमी देशांना समजले तेव्हा त्याचे नाव ‘त्सार बांबा’ ठेवण्यात आले. 20 ऑगस्टला रशियाच्या रोस्तम स्टेट अटॉमिक एनर्जी कॉर्पोरेशनने आपल्या यूट्यूब चॅनवर 30 मिनिटांची डॉक्यूमेंट्री जारी केली आहे.

स्फोटाच्या स्थळापासून 100 मैल अंतरावरील एका विमानाने मशरूमच्या आकाराच्या स्फोटाचा व्हिडिओ बनवला, जे सुमारे 2,13,000 फुट उंचीवर होते. या स्फोटानंतर अमेरिका-रशियाने 1963 मध्ये एक तह केला आणि दोन्ही देशांनी हवेत अणू बॉम्बच्या चाचणीवर बंदी आणली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रशियाने आपल्या या चाचणीद्वारे नेत्रदिपक तंत्रज्ञानाची संधी मिळवली.

व्हिडिओग्राफर आंधळा होऊ नये याची काळजी घेतली
या अणू बॉम्बची विध्वंस करण्याची भिषणता इतकी होती कॅमेरे शेकडो मैल दूर ठेवले होते. सोबतच ते लो लाईट पोझिशनमध्ये ठेवले होते, जेणेकरून शूट करणार्‍या व्यक्तीची अणू स्फोटाच्या उजेडाने दृष्टी जाऊ नये. या शक्तिशाली कॅमेर्‍यांनी सुमारे 40 सेकंदपर्यंत आगीच्या लोटांचे चित्रिकरण केले आणि त्यानंतर तो मशरूमच्या वा ढगांच्या रूपात बदलला.

अमेरिकेशी स्पर्धेत केवळ 7 वर्षात बनवला
हा बॉम्ब रशियाने अमेरिका आणि सोव्हिएत संघामधील शितयुुद्धाच्या सर्वात वाईट काळात बनवला होता. सोव्हिएत संघाने अमेरिकेच्या थर्मोन्यूक्लियर डिव्हाईसला टक्कर देण्यासाठी केवळ सात वर्षात ‘इवान’ सारखा मोठा अणू बॉम्ब बनवला होता. 1954 मध्ये अमेरिकेने आपल्या सर्वात मोठ्या थर्मोन्यूक्लियर डिव्हाईसची मार्शल आयलँडवर चाचणी केली होती. हा 15 मेगाटनचा होता आणि याचे नाव कास्टल ब्रावो होते.

अशाप्रकारे झाले होती चाचणी
अणू बॉम्ब ट्रेनद्वारे ओलेन्या एयरबेसवर आणण्यात आला, जेथून त्याला दूरच्या अंतरावर मारा करण्यात सक्षम टीयू-95 (बॉम्बर विमान) वर ठेवण्यात आले. 30 ऑक्टोबरला या बॉम्बरने उड्डाण घेतले आणि सुमारे 600 मैल दूर सेवेर्नी बेटवर पोहचले. विमानाने जमीनीपासून 13 हजार फुट उंचीवर पोहचून अणू बॉम्ब पॅराशूटने टाकला, जेणेकरून तो हळुहळु पृथ्वीवर पडावा आणि विमानाला अणू बॉम्बच्या प्रभावापूर्वी दूर जाण्यासाठी वेळ मिळावा. या स्फोटामुळे 5 तीव्रतेचा भूकंप येतो आणि तो जगभरात अनुभवला जातो.