Coronavirus Vaccine News : ‘कोरोना’ वॅक्सीन बनवण्यात रशियानं मारली बाजी, सर्व परिक्षण यशस्वी झाल्याचा सेचेनोव विद्यापीठाचा दावा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रशियाने कोरोना लसीवर बाजी मारली आहे. रशियाच्या सेचिनोव्ह विद्यापीठाचा दावा आहे की, त्याने कोरोना विषाणूची लस तयार केली आहे. विद्यापीठाचे म्हणणे आहे की, लसीच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहे. जर हा दावा खरा ठरला तर कोरोना विषाणूची ही पहिली लस असेल. दरम्यान, अमेरिकेसह जगातील अनेक विकसित देश कोरोनावर लस तयार करण्यात व्यस्त आहेत. अनेक चाचणी टप्प्यावर अयशस्वी झाले आहेत, परंतु रशियाने त्यास यशस्वी म्हणत पहिल्यांदा बाजी मारली आहे.

18 जूनपासून सुरू झाली लसीची चाचणी
इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदीम तारासोव म्हणाले कि, विद्यापीठाने 18 जूनला रशियाच्या गेमली इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अ‍ॅन्ड मायक्रोबायोलॉजीद्वारे तयार केलेल्या लसीची तपासणी करण्यास सुरुवात केली. तारासोव म्हणाले की, सेचीनोव्ह विद्यापीठाने कोरोनो व्हायरसविरूद्ध जगातील पहिल्या लसीची चाचणी स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

लवकरच बाजारात उपलब्ध होणार लस
सेचिनोव्ह विद्यापीठात इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल पॅरासिटोलॉजी, ट्रॉपिकल अँड वेक्टर -बॉर्न डिसीजचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव यांच्या म्हणण्यानुसार, मानवी आरोग्याच्या संरक्षणासाठी कोविड 19 ची लस यशस्वीरित्या तयार करणे हा या संपूर्ण अभ्यासाचा उद्देश होता. लुकाशेव यांनी स्पुतनिक यांना सांगितले की, सुरक्षेसाठी लसीच्या सर्व बाबींचा शोध घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, लवकरच लोकांच्या सुरक्षिततेसाठी बाजारात उपलब्ध होईल.

औषधे आणि जटिल उत्पादने तयार करण्यास देखील सक्षम सेचिनोव्ह
तारासोव म्हणाले की, सेचिनोव्ह विद्यापीठाने केवळ शैक्षणिक संस्था म्हणूनच नव्हे तर वैज्ञानिक व तांत्रिक संशोधन केंद्र म्हणूनही कार्य केले आहे. साथीच्या रोगाची लागण झाल्यास औषधंसारखी गंभीर आणि जटिल उत्पादने तयार करण्यासही ते सक्षम आहे. ते म्हणाले की आम्ही कोरोना लससोबत काम सुरू केले. ते म्हणाले की, या चाचणीतील स्वयंसेवकांच्या आणखी एका गटाला 20 जुलै रोजी सुट्टी देण्यात येईल.

अमेरिकेच्या मोडर्नानेही केले जाहीर
मॉडेरना या अमेरिकन कंपनीचा दावा आहे की, ते लवकरच कोरोना लस तयार करणार आहे. मॉडर्नाचे म्हणणे आहे की, ही लसीमुळे एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोना संसर्ग होऊ शकत नाही, कारण त्यामध्ये कोरोना विषाणू नसतो. 18 मे रोजी, मॉडर्नाचेने जाहीर केले की फेज -1 चाचणी निकाल सकारात्मक आले आहे. mRNA-1273 लस युनायटेड स्टेट्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि मॉडर्ना कंपनीने विकसित केली आहे. जुलै महिन्यात या लसीचा फेज-3 अभ्यास सुरू होईल, असेही मोडर्नाने आपल्या लसीबद्दल सांगितले होते. तिसर्‍या फेरीतील 30 हजार लोकांना लस डोस देण्याची योजना आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like