जापानची अँटीव्हायरल ड्रग Avifavir पासून रशियाला प्रचंड अपेक्षा, 11 जूनपासून देशातील ‘कोरोना’ रूग्णांना मिळणार औषध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : रशियाने म्हटले आहे की, देशातील सर्व रुग्णालयांमध्ये 11 जूनपासून कोरोना रूग्णांना जपानचे अवीफवीर म्हणून ओळखले जाणारे नोंदणीकृत अँटीवायरल औषध दिले जाईल. दरम्यान, रशिया पुढील आठवड्यात कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी मंजूर औषधे देण्यास सुरुवात करेल. अशी अपेक्षा आहे कि, यामुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेवरील दबाव कमी होईल.

यासह, देशात कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत घट होईल. रशियाच्या आरडीआयएफ सॉवरेन वेल्थ फंडच्या प्रमुखांनी एका मुलाखतीत सांगितले की, एका महिन्यात सुमारे 60,000 लोकांवर उपचार करण्यासाठी हे औषध तयार केले जाईल. आता कोरोना रूग्णांसाठी हे औषध किती प्रभावी ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, रशियाने जपानी औषधाच्या सुधारित आवृत्तीस परवानगी दिली आहे. मात्र, जपानने अद्याप या औषधाच्या वापरास मान्यता दिली नाही.

रेमेडीसीव्हीरकडून रशिययाच्या आशा, जगातील बरेच देश करतायेत प्रयोग
अद्याप जगात कोरोना विषाणूची कोणतीही लस तयार झालेली नाही. जरी संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या लसीच्या शोधामध्ये गुंतलेले असले तरी या औषधांचा मानवी चाचण्यांमध्ये अद्याप परिणाम झाला नाही. लसीचे मानवी चाचणी निकाल उत्साहवर्धक नव्हते. अशा परिस्थितीत गिलीडचे एक नवीन अँटीव्हायरल औषध रेमेडस्वीर खूपच आशादायक असल्याचे म्हंटले जात आहे. असा दावा केला जात आहे की, औषधाच्या तपासणीदरम्यान कोरोना संसर्ग रोखण्याचे मर्यादित परिणाम दिसून आले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना रूग्णांना हे औषध दिले जात आहे.