Russia Suspends Its Mission To NATO | रशियानं बंद केलं नाटोचं मिशन, NATO चं मॉस्कोमधील इनफॉर्मेशन ऑफिस होणार बंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रशियाचे परराष्ट्र मंत्री (Russian Foreign Minister) सर्गेई लाव्हरोव्ह (Sergei Lavrov) यांनी सोमवारी एक मोठी घोषणा केली आहे. लाव्हरोव्ह यांनी म्हटले की, त्यांचा देश नाटोसाठी मिशन निलंबित करत आहे (Russia suspended its mission to NATO). लाव्हरोव्ह यांनी म्हटले की, हे पाऊल मागील आठवड्यातील त्या निर्णयानंतर उचलले आहे ज्यामध्ये नाटोने रशियातील मिलिट्री मिशन (military mission) च्या आठ अधिकार्‍यांना बडतर्फ केले होते. या सर्व सदस्यांवर हेरगिरीचे आरोप होते.

नाटोकडून सांगण्यात आले होते की, हे सर्व लोक गुपचुप इन्टेलिजन्स ऑफिसर्सप्रमाणे काम करत होते.
त्यांच्याकडे अशा टीम आहेत ज्या हेडक्वार्टरमधून काम करण्यास सक्षम आहेत. लाव्हरोव्ह यांनी सोबतच घोषणा केली की,
मॉस्को येथील नाटोचे लायजन आणि इन्फॉर्मेशन ऑफिस सुद्धा बंद करण्यात येईल.

जगातील सर्वात मोठी सैन्य आघाडी

नाटो, अमेरिकेच्या नेतृत्वातील जगातील सर्वात मोठी सैन्य आघाडी आहे. तिचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये आहे.
स्काय न्यूजकडून सांगण्यात आले की, नाटोने ही कारवाई रशियन अधिकारी हत्या आणि हेरगिरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याने केली आहे.
2014 मध्ये जेव्हापासून यूक्रेनवर रशियाने कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पश्चिमी देशांशी त्यांचे संबंध बिघडले होते.

क्रिमियावर कब्जा करणे आणि 2016 च्या अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप करणे, ब्रिटनमध्ये राहात असलेले डबल एजंट सर्गेई स्क्रिपल आणि त्यांच्या मुलीवर विषारी पदार्थ टाकून हत्येचा प्रयत्न केल्यानंतर तणाव वाढत गेला.
रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या स्पीकर लियोनिद लुत्सकी यांनी संकेत दिला आहे की, लवकरच रशिया उत्तरादाखल पावले उचलेल.

 

नाटोने रशियाला ठरवले दोषी

नाटोचे प्रमुख जेन्स स्टोलनबर्ग यांनी गुरुवारी म्हटले की, रशियाच्या ‘दुर्दैवी हालचाली’ वाढल्याने संघटनेने आठ रशियन अधिकार्‍यांना दिलेली सैन्य आघाडी मान्यता समाप्त केली आहे.

स्टोलनबर्ग यांनी म्हटले होते की, या निर्णयाचा संबंध कोणत्याही विशेष घटनेशी नाही.
परंतु आम्ही काही काळापासून रशियाच्या दुर्दैवी हालचाली वाढताना पाहिल्या आहेत आणि यासाठी आम्हाला सतर्क राहणे आवश्यक आहे.

त्यांनी म्हटले की, शीतयुद्ध संपल्यापासूनच नाटो आणि रशियामधील संबंध खराब स्थितीत आहेत. स्टोलनबर्ग यांनी रशियाला यासाठी दोषी ठरवले होते.
त्यांचे म्हणणे होते की, रशियाच्या वर्तनामुळे सर्व समस्या होत आहेत.

त्यांचे म्हणणे होते की, नाटोने रशियाचे आक्रमक वर्तन पाहिले आहे. हे वर्तन केवळ युक्रेनच्या विरूद्धच पाहिले नाही तर त्यांना सैन्य उपस्थिती वाढवताना आणि शस्त्रास्त्रे नियंत्रण कराराचे उल्लंघन करताना सुद्धा पाहिले आहे.

 

Web Title : Russia Suspends Its Mission To NATO | russia suspends its mission to nato foreign minister says mission moscow will be closed news of europe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 2,078 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Risod police | 3.45 कोटी रुपयांचा 11 क्विंटल गांजा जप्त, 4 जणांना अटक

Small Saving Scheme | पैशांची असेल गरज तर ‘या’ 2 बचत योजनांवर मिळते चांगले कर्ज; जाणून घ्या व्याजदर