Russia-Ukraine War | वैद्यकीय शिक्षणासाठी यूक्रेनला का जातात भारतीय मुले?, ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Russia-Ukraine War युद्धादरम्यान, भारताने तेथे अडकलेल्या सुमारे 16,000 नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश देखील येतंय. यात सुमारे 14,000 भारतीय विद्यार्थी (Indian Students) आहेत, ज्यापैकी मोठी संख्या वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्यांची आहे. अखेर, इतके लोक डॉक्टर होण्यासाठी भारतातून युक्रेनला का जातात? ते जाणून घेवूयात. (Russia-Ukraine War)

 

1) भारतापेक्षा स्वस्त वैद्यकीय शिक्षण
युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण (Medical Education in Ukraine) भारताच्या तुलनेत अनेक पटीने स्वस्त आहे. भारतात सरकारी महाविद्यालये सोडली तर एका विद्यार्थ्याला खासगी महाविद्यालयातून MBBS ची पदवी मिळवण्यासाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च येतो. तर युक्रेनमध्ये 6 वर्षांच्या वैद्यकीय अभ्यासासाठी हा खर्च फक्त 22 ते 25 लाख रुपये आहे.

 

2) जगभरात पदवीला व्हॅल्यू
युक्रेनमधून वैद्यकीय पदवीचे मूल्य जगभरात आहे. त्याच वेळी, विद्यार्थ्यांना येथे ग्लोबर एक्सपोजर देखील मिळते. Study in Ukraine वेबसाइटनुसार, युक्रेनियन वैद्यकीय पदवी जागतिक आरोग्य संघटना (WHO), युरोपियन परिषद आणि इतर जागतिक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त आहेत.

3) भारतात जागांसाठी चढाओढ
युक्रेनमधील वैद्यकीय अभ्यासाच्या लोकप्रियतेचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे भारतात एमबीबीएसच्या जागांसाठी असलेली तीव्र स्पर्धा. देशात एमबीबीएसच्या सुमारे 88,000 जागा आहेत आणि त्यातही सरकारी जागांची संख्या जवळपास निम्मी आहे. (Russia-Ukraine War)

 

तसेच 2021 मध्ये या जागांसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली होती. त्याच वेळी, भारतातून दरवर्षी सुमारे 18,000 विद्यार्थी वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी युक्रेनमध्ये जातात आणि तिथली प्रवेश प्रक्रियाही खूप सोपी आहे.

 

4) भारतात परतल्यावर चांगल्या संधी
युक्रेनमधील वैद्यकीय पदव्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे मान्यताप्राप्त आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनमधून स्वस्तात वैद्यकीय पदवी मिळवून मध्यमवर्गीय विद्यार्थी भारतात परततात. येथे आल्यानंतर त्यांना काही कागदपत्रे देऊन मेडिकल इंटर्नशिप आणि प्रॅक्टिसचा परवाना मिळतो. तसेच परदेशी पदवी घेतल्यास नोकरीच्या चांगल्या संधी मिळतात.

 

5) युरोपात स्थायिक होण्याची संधी
युक्रेनमधून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना युरोपमध्येच काम करण्याची संधी मिळते.
एवढेच नाही तर नोकरीसोबतच त्यांना युरोपमध्ये कायमस्वरूपी रहिवासी होण्याची संधीही आहे.

 

 

Web Title :- Russia-Ukraine War | why indian students go to ukraine study medical mbbs now stranded in large number amid russia attack

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maratha Reservation | मराठा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत घेतलेले 15 महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या

 

Governor Bhagat Singh Koshyari | छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण, माफी मागण्याचं टाळलं

 

ICAI Pune | आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षपदी सीए काशिनाथ पठारे; उपाध्यक्षपदी सीए राजेश अग्रवाल, सचिवपदी सीए प्रीतेश मुनोत, खजिनदारपदी सीए प्रणव आपटे यांची निवड