Corona Vaccine : धक्कादायक ! रशियात फक्त 38 लोकांवर ट्रायल, 144 प्रकारचे साइड ‘इफेक्ट’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसवर जगातील पहिली लस रशियाने तयार केल्याची घोषणा केली आहे. मात्र, ही लस किती प्रभावी आणि सुरक्षित आहे, हे अजून सिद्ध झाले नाही. लसीच्या नोंदणी दरम्यान रशियन सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांवरून सुरक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला.

जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील वैज्ञानिकांनी रशियन लसीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चाचणीच्या नावाखाली केवळ 38 व्हॉलेंटिअर्सचा या लसीचा डोस देण्यात आला. ट्रायलच्या तिसर्‍या टप्प्याबाबत रशिया कोणतीही माहिती द्यायला तयार नाही. रशियन सरकारने असा दावा केला आहे की सौम्य तापाशिवाय इतर कोणतेही साइड इफेक्ट दिसून आले नाही. मात्र कागदपत्रांमध्ये असे दिसून आले आहे की 38 स्वयंसेवकांमध्ये 144 प्रकारचे साइड इफेक्ट दिसून आले.

चाचणीच्या 42 व्या दिवशीही 38 पैकी 31 स्वयंसेवकांमध्ये साइड इफेक्ट दिसले, याची माहिती मात्र कागदपत्रांमध्ये दिली गेली नव्हती. रशियाने ही लस बनविण्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही. म्हणूनच ती माहिती देऊ इच्छित नाही अशी शंका या संघटनेने व्यक्त केली आहे. लसीच्या चाचणीच्या निकालांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा पुरावा चांगला आहे. निगेटिव्ह साइड इफेक्ट कोणत्याही स्वयंसेवकात दिसले नाहीत.

मात्र, सत्य हे आहे की ज्यांच्यावर या लसीचा ट्रायल करण्यात आला त्यांना ताप, शरीरावर वेदना, शरीराचे तापमान वाढणे, खाज आणि इंजेक्शन दिलेल्या जागी सूज यासारखे साइड इफेक्ट दिसले. त्याशिवाय शरीरातील उर्जा कमी होणे, भूक न लागणे, डोकेदुखी, अतिसार, घश्यात सूज येणे, नाक वाहणे यासारखे तब्बल 144 साइट इफेक्ट दिसले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like