2025 पर्यंत भारताला मिळणार S-400 एयर डिफेन्स मिसाईल सिस्टम, काश्मीरबाबत शंकाच नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरबद्दलच्या भारताच्या धोरणांबाबत कोणतीही शंका नसल्याचे रशियाने यावेळी स्पष्ट केले, तसेच ज्यांना संशय आहे ते काश्मीरला भेट देऊ शकतात, तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही द्विपक्षीय बाब असल्याचेही रशियाचे म्हणणे आहे. रशियाने असेही म्हटले आहे की, ते लवकरच एस – 400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला देतील. एका अहवालानुसार 2025 पर्यंत सर्व एस – 400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला देण्यात येणार आहेत. त्यासंबंधित उत्पादनास भारतात सुरूवात झाली आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर 22 मार्च आणि 23 मार्च रोजी रशिया – भारत – चीन त्रिपक्षीय बैठकीत भाग घेण्यासाठी रशियाला भेट देतील. एस – 400 ही एस – 300 ची सुधारित आवृत्ती आहे, जी पूर्वी केवळ रशियन संरक्षण दलासाठी उपलब्ध होती. रशियाचे भारतातील राजदूत निकोलाई कुदाशेव यांनी शुक्रवारी सांगितले की, “काश्मिरातील भारताच्या धोरणांवर शंका घेणारे परदेशी राजदूत या आठवड्याच्या सुरूवातीच्या काळात केंद्र शासित प्रदेशात गेले.” ज्यांना काश्मीरच्या परिस्थितीची चिंता आहे, ज्यांना काश्मीरमधील भारतीय धोरणांवर शंका आहे, त्यांना हवे असल्यास ते प्रवास करू शकतात. आम्हाला कधीही शंका नव्हती. ”

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याच्या चीनच्या प्रयत्नाबद्दल विचारले असता कुदाशेव म्हणाले की, ही बाब भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय आहे. दरम्यान, रशियन मिशनचे प्रमुख, उपप्रमुख रोमन बाबूसकिन म्हणाले की, एस – 400 क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरू झाले आहे. “2025 पर्यंत सर्व एस – 400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा भारतात वितरित केली जाईल”.

दरम्यान, ऑक्टोबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मॉस्कोहून नवी दिल्ली येथे एस – 400 ट्रायम्फ क्षेपणास्त्र यंत्रणा पुरवण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. यावर अमेरिकेने इशारा दिला की, जर हा करार झाला तर ते भारतावर बंदी घालतील. अमेरिकेच्या नवीन कायद्यांनुसार, जो देश रशियन संरक्षण किंवा गुप्तहेर क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना दुय्यम प्रतिबंधांचा सामना करावा लागू शकतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like