खळबळजनक ! रशियन सुंदरी ‘इन्स्टाग्राम’ स्टारची गळा कापून हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही हॉलिवूड स्टारइतकी लोकप्रियता मिळविलेल्या रशियन सुंदरी इन्स्टाग्राम स्टार हिचा गळा कापून निर्घुण हत्या केल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. इकातेरिना काराग्लानोव्हा असे या रशियन सुंदरीचे नाव आहे.

इकातेरिना काराग्लानोव्हा ही आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करायची. तिने एक फोटो टाकला तरी तिच्या हजारो चाहत्यांची त्याला लाईक करण्यासाठी चढाओढ लागायची. हॉलिवूड स्टारएवढीच ती लोकप्रिय होती. ती कोठेही गेली तरी तेथील फोटो शेअर करीत असे. प्रवास आणि त्याचे सुंदर फोटो ती नियमितपणे शेअर करीत असे. २४ वर्षाच्या इकातेरिना काराग्लानोव्हाचे ८५ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. इकातेरिनाने नुकतीच डिग्री मिळवली होती. ती डॉक्टर झाली होती.

दरम्यान, तिच्याशी संपर्क होत नसल्याने तिच्या आई वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. तिचे घर बंद होते. पोलिसांनी घरात प्रवेश करुन शोधाशोध केली. तेव्हा तिचा गळा कापून मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. या वृत्ताने रशियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करीत असून अजूनही कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –