निर्जन रस्त्यावर 2 मुलींवर बलात्कार, दोन्ही पिडीता पोहचल्या पोलिस ठाण्यात ; अधिकारी म्हणाले – ‘लॉकडाऊनमध्ये बाहेर का पडलात, काढा 6000 रूपये’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत या व्हायरसने 43 लाख लोकांना संक्रमित केले आहे. तसेच यामुळे मरणार्‍यांची संख्या सुमारे 3 लाखांपर्यंत पोहचणार आहे. रशियातही कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. यादरम्यान दोन मुलींनी आपल्यावर झालेला रेप आणि लुटमारीची तक्रार नोंदवण्याची मागणी केली. परंतु, पोलिसांनी या दोन मुलींना लॉकडाऊनचे नियम तोडल्याने दोषी ठरवत दंठ ठोठावला. या घटनेने लोक हैरान झाले आहेत. जाणून घेवूयात पोलिसांनी पीडितांना कसे ठरवले गुन्हेगार…

हे प्रकरण 20 एप्रिलचे आहे. मात्र नुकतीच ही बातमी मीडियामध्ये आली आहे. द सन या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातमीनुसार, सैबेरियाच्या क्रास्नोयार्स्क शहरात राहणार्‍या दोन तरूणी, ज्यांचे वय अनुक्रमे 17 आणि 18 वर्षे आहे, त्यांच्यावर रेप झाला आणि लुटमार करण्यात आली. या दोघीजणी खास मैत्रिणी असून एकमेकिंना भेटण्यासाठी त्या बाहेर पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे रस्ता निर्जन होता. तेव्हा एका व्यक्तीने त्यांना पकडले. यामध्ये एका मुलीवर रेप केला गेला, तर दुसरीवर लैंगिक हल्ला करण्यात आला. तसेच त्यांचे दागिने आणि मोबाईल लुटण्यात आले.

या घटनेनंतर दोन्ही मुली क्रास्नोयार्स्क पोलीस ठाण्यात पोहचल्या. आपल्या सोबत जे घडले ते त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघींची तक्रार दाखल करून घेतली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 55 वर्षाच्या एक व्यक्तीला अटक केली, ज्याच्याकडून दोन्ही मुलींच्या लुटलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या. परंतु, हैरान करणारी गोष्ट म्हणजे रेपसारख्या गुन्ह्याला बळी पडलेल्या या मुलींकडून पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम तोडल्याचा गुन्हा केल्याने 6 हजार रूपये दंड वसूल केला. पोलिसांनी म्हटले की, रशियात लॉकडाऊनमध्ये केवळ आवश्यक कामासाठीच बाहेर पडण्याची परवानगी आहे. परंतु, या मुलींच्या जबाबावरून समजते की, दोघी भेटण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. हा दंड आकारल्याने मुलींच्या घरच्यांनी जोरदार विरोध केला आहे. प्रकरण जेव्हा उच्च स्तरावर पोहचले तेव्हा क्रास्नोयार्स्कच्या कोविड 19 च्या ऑपरेशनल हेडक्वार्टरच्या ऑफिसर्सने मुलींवर लावण्यात आलेला दंड माफ केला. तसेच पोलिसांना पैसे परत करण्याचे निर्देश दिले.