रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी लावली स्टेट इमर्जन्सी, सायबेरियाच्या पॉवर प्लांटमधून 20,000 टन डिझेल ‘लिक’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   बुधवारी सायबेरियातील पॉवर प्लांटतून सुमारे 20 हजार टन डिझेल गळती झाली. यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राज्य आपत्कालीन घोषणा केली. दरम्यान, शुक्रवारी डिझेल गळती झाली, या प्रकरणाची माहिती उशीरा मिळाल्याने पुतीन आपल्या प्रशासनावर खूप चिडले. मॉस्कोपासून 2,900 किलोमीटरवर नॉरलिस्क शहरात हा उर्जा प्रकल्प आहे. गळती झालेला डिझेल प्लांटपासून अंबरना नदीकडे वाहत होता. अंबरना नदीचे पाणी एका सरोवरातून येते, ज्याचे पाणी इतर नद्यांमधून आर्क्टिक महासागरापर्यंत पोहोचते. सध्या प्रशासनाने डिझेल थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

डिझेल गळतीमुळे कमीतकमी नुकसान झाले पाहिजे, अशा कठोर सूचना रशियन राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याच वेळी, वर्ल्ड लाइफ फंड रशियाचे संचालक अलेक्सी म्हणाले की, अशा प्रकारे डिझेलची गळती होणे पर्यावरण तसेच प्राण्यांसाठीदेखील घातक आहे. यामुळे मासे आणि इतर संसाधनांचे नुकसान होईल. तसेच यामुळे 1.30 कोटींचे नुकसान होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. आर्कटिक महासागरापर्यंत पोहोचू नये म्हणून रशियन प्रशासन सध्या इतर नद्यांमध्ये डिझेल मिसळू नये म्हणून प्रयत्न करीत आहे.