…तर पत्रकारांना परदेशी एजंट घोषित केले जाणार, रशियन सरकारच्या घोषणेनंतर प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियाचे अद्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी मुक्त पत्रकार आणि ब्लॉगर्सना परदेशी एजंट घोषित करण्याच्या प्रस्तावाला रशियन सरकार तर्फे मंजुरी मिळवून दिली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध येणार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. केवळ पत्रकारांनाच नाही तर विविध माध्यम संघटना, समूह यांच्याकडून निधी मिळवणारे ब्लॉगर्स आणि इंटरनेट वापर कर्त्यांना देखील हा नवीन कायदा लागू होणार आहे.

राजकारणात सहभाग घेणाऱ्या आणि परदेशातून पैसे स्वीकारणाऱ्यांना नव्या कायद्यामुळे परदेशी एजंट परदेशी एजंट घोषित करता येऊ शकतं आणि असे झाल्यास व्यक्तीला आपला निर्दोषपणा सिद्ध करावा लागेल किंवा दंड भरावा लागेल.रशियन सरकारच्या नव्या कायद्याबद्दल अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स यांच्यासह नऊ सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

रशियन सरकारच्या या निर्णयानंतर देशात प्रचंड मोठ्या गदारोळाला सुरुवात झाली आहे. तसेच हा नवा कायदा तत्काळ लागू करण्यात आल्याची माहिती रशियन सरकारने आपल्या संकेतस्थळांवर टाकली आहे.

२०१७ मध्ये रशियानं पहिल्यांदा अशा प्रकारचा कायदा केला होता. त्यावेळी आरटी टेलिव्हिजनला अमेरिकेनं परदेशी एजंट घोषित केलं होतं. त्यामुळे पाश्चिमात्य देश आमच्या पत्रकारांना परदेशी एजंट ठरवतात. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हा कायदा मंजूर केल्याचं रशियन सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like