SputnikVaccine : भारतात तयार होणार रशियन वॅक्सीन; प्रत्येक वर्षी 10 कोटी डोसचा करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगाची नजर आता कोरोना वॅक्सीनवर आहे. याच पार्श्वभूमीवर रशियन वॅक्सीन स्पुटनिक-व्हीसाठी भारतीय औषध कंपनी हेटरोने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) शी करार केला आहे. या अंतर्गत भारतात दरवर्षी वॅक्सीनचे 10 कोटी डोस बनवले जातील.

रशियाच्या सावरेन वेल्थ फंडने एका वक्तव्यात म्हटले आहे की, कोरोनाची वॅक्सीन स्पुटनिक-व्हीचे उत्पादन 2021 मध्ये सुरू करण्याचा उद्देश आहे. रायटर्सनुसार, स्पुटनिकच्या ट्विटर अकाउंटवरसुद्धा एका वक्तव्याच्या संदर्भाने ही माहिती देण्यात आली आहे.

सध्या या वॅक्सीनच्या तिसर्‍या टप्प्यातील ट्रायल बेलारूस, यूएई, व्हेनझुएला आणि अन्य देशांमध्ये सुरू आहे, तर भारतात दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्याची चाचणी सुरू आहे.

रशियाच्या या वॅक्सीनचे डोस बनवण्यासाठी 50 पेक्षा जास्त देशांनी तयारी दर्शवली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सप्लायसाठी वॅक्सीनचे प्रॉडक्शन भारताशिवाय चीन, ब्राझील, साऊथ कोरिया आणि दुसर्‍या देशांमध्येसुद्धा केले जाईल.

हेटरो लॅब्स लिमिटेडचे डायरेक्टर, मुरली कृष्ण रेड्डी यांनी म्हटले की, कोरोनाच्या उपचारात स्पुटनिक व्ही वॅक्सीन सर्वांत परिणामकारक आहे. वॅक्सीन तयार करण्यासाठी आरडीआसएफसोबत या पार्टनरशिपमधून आम्ही खूप आनंदित आहोत. ही पार्टनरशिप कोरोनाच्या विरुद्ध लढाईत आमची कमिटमेंट आणि मेक इन इंडियाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आणखी एक पाऊल आहे.

किती परिणामकारक आहे ही वॅक्सीन :
रशियाची स्पुटनिक व्ही वॅक्सीन 95 टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. ही वॅक्सीन -20 ते -70 डिग्री तापमानाच्या दरम्यान स्टोअर केली जाऊ शकते. याच गोष्टीमुळे भारतात या वॅक्सीनसाठी मोठे आव्हान असू शकते.

किती असेल वॅक्सीनची किंमत :
रशियाच्या स्पुटनिक व्हीच्या एका डोसची किंमत 10 डॉलर (सुमारे 750 रुपये) असेल. एका अधिकृत वक्तव्यानुसार रशियाच्या नागरिकांसाठी लसीकरण निःशुल्क असेल. वक्तव्यात सांगण्यात आले आहे की, आरडीआयएफला सध्या अन्य देश आणि कंपन्यांकडून अर्ज प्राप्त होत आहेत.

You might also like