भारतात सिंगल डोस व्हॅक्सीन लवकरच येणार, दरवर्षी Sputnik V लसीच्या 85 कोटी डोसच उत्पादन, जाणून घ्या किंमत

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, रशियाकडून Sputnik V या लसीची दुसरी खेप रविवारी (दि. 16) भारतात दाखल झाली. येत्या आठड्यापासून Sputnik V ही लस बाजारात देखील उपलब्ध होणार आहे. तसेच भारतात या लसीच उत्पादन वाढवून 85 कोटी डोस प्रति वर्ष करण्यात येणार आहे. रशियामध्ये जुलै 2020 पासून लसीकरणासाठी याच लसीचा वापर होत आहे. ही लस तिच्या प्रभावीपणासाठी जगभरात ओळखली जाते.

भारतातील रशियाचे राजदूत एन. कुदाशेव यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, Sputnik V ही एक रशियन-भारतीय लस आहे. तसेच भारतात लवकरच या लसीची सिंगल डोस लस स्पुटनिक लाईट (Sputnik Lite) आणली जाणार आहे. भारतात लसीच उत्पादन तेजीने वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या विरोधातही ही लस काम करणार असल्याचा दावा रशियाच्या शास्त्रज्ञानी केल्याचे कुदाशेव म्हणाले. स्पुटनिक व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर केली आहे. भारतात 995. 40 रुपये प्रति डोस या दराने मिळणार आहे. डॉ. रेड्डीज ही औषध निर्माता कंपनी रशियाची ही लस भारतात बनविणार असून मेक इन इंडियाची ही लस आणखी स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे.