बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनण्यासाठी आलेल्या रशियन युवतीवर पोलिस निरीक्षकाकडून 12 वर्षापासून बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चेंबूर पोलीस ठाण्यात एका रशियन महिलेने एक पोलीस अधिकारी मागील 12 वर्षांपासून आपल्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याने वारंवार आपला गर्भपात केल्याचा देखील आरोप या महिलेने केला आहे. या प्रकरणी महिलेने पिंपरी चिंचवडमध्ये तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

बॉलीवुड में एक्ट‍िंग करने आई थी रश‍ियन लड़की, कई बार हुई रेप का श‍िकार

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, हि महिला 2004 मध्ये अ‍ॅक्टिंग शिकण्यासाठी मुंबईमध्ये आली होती. त्यानंतर तिचा व्हिसा संपल्यानंतर तिची ओळख आरोपी पोलीस अधिकारी अनिल जाधव याच्याशी झाली. त्यानंतर त्याने पीडित महिलेचा खोट्या कागदपत्रांच्या आधारे नकली पासपोर्ट तयार केला. मात्र त्यानंतर याचीच भीती दाखवून त्याने अनेकदा बलात्कार केला. यावेळी गर्भवती राहिली असता त्याने तीन वेळा तिचा गर्भपात देखील केला. त्यावेळी तिने तक्रार करण्याची धमकी दिली. आता धर्म परिवर्तन करून पीडितेशी विवाह केला. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगा देखील आहे.

बॉलीवुड में एक्ट‍िंग करने आई थी रश‍ियन लड़की, कई बार हुई रेप का श‍िकार

पीडितेच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जाधव हे विवाहित असून त्याने या महिलेला आणि मुलाला मारण्याचा अनेकदा प्रयत्न देखील केला. तसेच या पोलिसावर दोन हत्यांचा आरोप असून त्याचा देखील तपास सुरु आहे. तिच्या बरोबर मुंबईमध्ये हि घटना घडल्यानंतर ती आपल्या मुलाला घेऊन पिंपरी चिंचवडला आली असता तो तिथे देखील पोहोचला. त्यानंतर गुरुवारी तिने मुंबईला जात त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

बॉलीवुड में एक्ट‍िंग करने आई थी रश‍ियन लड़की, कई बार हुई रेप का श‍िकार
पीडितेचे वकिल नितीन सातपुते प्रसार माध्यमांना माहिती देताना

दरम्यान, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्काराप्रकरणी कलम 376, अनैसर्गिक संभोगप्रकरणी 377, जबरदस्ती गर्भपाताप्रकरणी 313 तर धमकी दिल्याप्रकरणी कलम 356 नुसार गुन्ह्यांची नोंद केली आहे. तसेच आरोपी पोलीस अधिकारी सध्या बडतर्फ असून पीडितेने सुरक्षेची मागणी केली आहे.

बॉलीवुड में एक्ट‍िंग करने आई थी रश‍ियन लड़की, कई बार हुई रेप का श‍िकार

Visit : Policenama.com