Live स्ट्रीमिंगदरम्यान गर्लफ्रेंडला विवस्त्र थंडीत बसवले, मृत्यू झाल्याने रशियन यूट्यूबरला अटक

मॉस्को : एका रशियन यूट्यूबरला गर्लफ्रेंडची हत्या करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. कारण, या यूट्यूबरने लाइव्ह स्ट्रीमिंगच्या दरम्यान आपल्या गर्लफ्रेंडला थंडीत उघड्यावर बसलवले होते. त्याची गर्लफ्रेंड वेलेंटीना ग्रिगोरिवा हिचा हायपोथर्मिया म्हणजेच शीत दंशाने मृत्यू झाल्याचे मानले जात आहे.

28 वर्षांची होती वेलेंटीना, थंडीने थरथरत होती
रशियन यूट्यूबर स्टाफ रीफ्लेवर आरोप आहे की, त्याने मॉस्कोच्या कडाक्याच्या थंडीत गर्लफ्रेंडला केवळ अंडरवेयरमध्ये बाल्कनीत बसण्यास भाग पाडले, ज्यामुळे 28 वर्षांच्या वेलेंटीनाचा मृत्यू झाला.

वेलेंटीना 15 मिनिटांपर्यंत बाहेर कडाक्याच्या थंडीत थरथरत होती, परंतु तिच्या बॉयफ्रेंडने तिची मदत केली नाही. जेव्हा त्याने तिला आत आणले, तेव्हा ती अस्वस्थ करणारी दृश्य सुद्धा लाइव्ह प्रसारणात दिसत होती. लवकरच रशियन यूट्यूबरला हे जाणवले की, वेलेंटीनाचा श्वास बंद झाला आहे आणि तिची धडधड थांबली आहे.

लाइव स्ट्रीमिंगमध्ये मृत्यूची दिली माहिती
व्हिडिओमध्ये यूट्यूबर ओरडताना दिसला की, वाल्या…वाल्या…असं वाटत आहे की तू जिवंत नाहीस. मला चिंता वाटतेय….मला तुझी धडधड जाणवत नाही. यानंतर आपल्या प्रेक्षकांना त्याने सांगितले की, वाल्याची नस बंद पडली आहे, ती पिवळी पडली आहे आणि श्वास घेत नाही.

पोलीस पोहचले तेव्हा सुद्धा लाइव्ह स्ट्रीमिंग सुरूच
यानंतर पोलीस आणि मेडिकल स्टाफ पोहचल्यानंतर सुद्धा ते लाइव्ह स्ट्रीमिंग सुरूच होते. वाल्याला घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. वाल्याचा मृत्यू झाल्यानंतर दोन तासांपर्यंत रशियन यूट्यूबरचा लाइव्ह व्हिडिओ सुरू होता. यानंतर पोलिसांनी रीफ्लेला अटक केली.

गरोदर असल्याबाबत दुजोरा नाही
या प्रकरणाबाबत रशियन तपास समितीने म्हटले की, प्रकरणाचा तात्काळ तपास सुरू करण्यात आला. यामध्ये हा शोध घेतला जात आहे की, लाइव्ह प्रसारणात तरूणाने कायद्याचे उल्लंघन केले होते किंवा नाही.फॉरेन्सिक तज्ज्ञांनुसार, रीफ्लेच्या गर्लफ्रेंडचा हायपोथर्मियामुळे मृत्यू झाला आहे, ज्यामुळे यूट्यूबरला किमान दोन वर्षाची शिक्षा होऊ शकते. मात्र, तपास समितीच्या रिपोर्टनुसार, गर्लफ्रेंड गरोदर असल्याचे आढळलेले नाही.

यूट्यूबने केला निषेध, असा कंटेट मंजूर नाही
तर यू-ट्यूबने या फुटेजचा निषेध केला आहे आणि एका वक्तव्यात म्हटले आहे की, आम्हाला या दुखद घटनेबाबत समजल्यानंतर हैराण आहोत. यूट्यूबने म्हटले की, अशा प्रकारचा कंटेट मंजूर नाही.