धक्कादायक खुलासा ! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासह देशातील श्रीमंतांना एप्रिलमध्येच दिली होती ‘कोविड’ लस

मॉस्को : वृत्तसंस्था – जगाभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात अनेक लोकांचा मृत्यू या कोरोना विषाणूमुळे झाला आहे. देशातील विविध संस्था कोरोनाची लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाखो लोक लशीच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच रशियाबाबत एक धक्कादायक महिती समोर आली आहे.

कोरोना व्हायरसची लस तयार करत असलेल्या संशोधकांच्या शेकडो टीमधील काही टीम एक पाऊल पुढे जात आहे. यामध्ये रशियाच्या संशोधकांचा समावेश आहे. रशियाने दावा केला आहे की त्यांनी कोरोना लशीचं मानवी ट्रायल पूर्ण केलं आहे. आताच एका रिपोर्टमधील खुलाशानुसार रशियाचे पुतीन आणि रशियातील श्रीमंत व्यक्ती तसेच अरबपतींनी एप्रिल महिन्यातच कोरोनाची लस टोचून घेतली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रशियातील अरबपती आणि राजकीय नेत्यांना कोरोना व्हायरसची लस एप्रिलमध्ये देण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना देखील ही लस देण्यात आली आहे की नाही हे सांगू शकत नाही. अल्यूमिनियमची मोठी कंपनी युनायटेड रसेलचे प्रमुख अधिकारी, अरबपती आणि सरकारी अधिकाऱ्यांना लस देण्यात आली आहे. ही लस मॉस्को येथील रशियाची सरकारी कंपनी गमलेया इन्स्टिट्यूटने एप्रिलमध्ये तयार केली होती. या खुलाशानंतर आता मोठी चर्चा सुरु झाली आहे. जर खरंच रशियाने कोरोनाच्या लशीची मानवी ट्रायल पूर्ण केली असेल तर त्याबाबत महिती का देण्यात आली नाही.