Coronavirus Vaccine : रशियन लस स्फुटनिक-व्ही ठरली 92 % परिणामकारक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने ( Corona Virus) जगभर धुमाकूळ घातला आहे. चीनमधून ( China) आलेल्या या व्हायरसवर अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. जगभरातील देश यावर लस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑगस्ट महिन्यात रशियाच्या ( Russia) लशीला यश आल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता या लशीविरोधात मोठी बातमी समोर आली असून, रशियाची स्फुटनिक- व्ही ही लस कोरोनापासून वाचण्यासाठी 92 टक्के परिणामकारक असल्याचं रशियाने सांगितलं आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड ( Russian Direct Investment Fund) या संस्थेने या लशीच्या ट्रायलचे अंतिम निकाल हातात आल्याचं कळवलं आहे. सध्या ही लस बाजारात आहे.

रशियाने या चाचणीची १६ हजार लोकांवर चाचणी केली होती. यामध्ये या लोकांना दोन दोन डोस देण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात ११ तारखेला या लसीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ( Vladimir Putin) यांच्या मुलीलाही देण्यात आली होती. ही लस मॉस्कोमधील गमालिया इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केली आहे. रशियाची ही लस एडीनेव्हायरस व्हेक्टरवर आधारित असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती.

ही लस मॉस्कोमधील गमालिया इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केली आहे. रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. मात्र, इतर देशांसाठी या लशीची किंमत किती असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.दरम्यान, रशियाने ही लस बाजारात आणल्यानंतर त्यांच्यावर शंका उपस्थित करण्यात येत होती. ही लस बनवताना रशियाने घाई केल्याचेदेखील अनेक वैज्ञानिकांनी म्हटले होते. रशियाच्या या लशीच्या चाचण्या भारतातदेखील सुरू झाल्या आहेत. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने या लशीच्या चाचणीची जबाबदारी घेतली आहे.