‘रूस्तम-ए-हिंद’ दादू चौगुले यांचे 73 व्या वर्षी निधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – रूस्तम-ए-हिंद, महान भारत केसरी आणि राष्ट्रकुल रौप्यपदक विजेते दादू चौगुले यांचे आज (रविवार) दुपारी येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. चौगुले यांच्या निधनामुळं कोल्हापूरातील सर्व तालमींवर शोककळा पसरली आहे. अनेक कुस्तीप्रेमींना त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आहे.

भारत सरकारने चौगुले यांचा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला होता. देश-विदेशातील अनेक मल्लांना त्यांनी लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखविले होते. पैलवान दादू चौगुलेंचे नाव आखाडयात मोठया मानानं घेतलं जायचं. चौगुलेंनी लाल मातीसह मॅटवरही राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला होता. सन 1973 साली न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या 100 किलो गटातील कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.

Loading...
You might also like