Ruta Dudhagra | पती भाजप नेता, तर पत्नी आपची नगरसेविका, राजकीय मतभेदातून झाला घटस्फोट

सूरत : वृत्तसंस्था –  राजकीय मतभेदांमुळे (political differences) गुजरातमधील (Gujarat) सूरत (Surat) येथे एका तरुण इंजिनिअर दांपत्याला (engineer couple) घटस्फोट (Divorce) घेण्याची वेळ आली. पती (Husband ) भाजपचा नेता (BJP leader) आहे तर पत्नी (Wife) आम आदमी पार्टीची (AAP) नगरसेविका (Corporator) आहे. या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला आहे. रुता दुधागरा Ruta Dudhagra (वय-26) आणि चिराग (Chirag) (वय-28) असे विभक्त झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. रुता या सध्या आपले वैयक्तीक सामान घेण्यासाठी कायदेशीर पर्याय (Legal option) शोधत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

घटस्फोट झाल्यानंतर रुता दुधागरा आता पति चिराग यांच्याकडून त्यांचे वैयक्तिक साहित्य, जसे शाळा आणि कॉलेजच्या मार्कशिट्स (School and college marksheet), काही महत्त्वाची कागदपत्रे (Important document), त्यांच्या नगरसेवक पदासंबंधीत काही दस्तऐवज, मोपेड आणि लॅपटॉपसह (Moped and laptop) इतर मौल्यवान वस्तू घेण्यासाठी त्या कायदेशीर पर्याय शोधत आहेत.

घटस्फोटासाठी पतीला दिले 7 लाख

आयटी इंजिनिअर (IT Engineer) असलेल्या रुता यांनी सांगितले की, माझे पती मागील काही दिवसांपासून बेरोजगार (Unemployed) होते. त्यामुळे मी त्यांना सात लाख रुपये दिले.
याशिवाय माझ्याकडे असलेले माझे 90 ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचे दागिने (Jewelry) घेतले आहेत.
पतीला दिलेले रोख पैसे हे विभक्त होण्यासाठी होते, असे मी मानते.
परंतु, आता मी माझे दस्तऐवज घेण्यासाठी कायदेशीर पर्याय (Legal option) शोधत असल्याचे रिता दुधागरा यांनी सांगितले.

तीन वर्षापूर्वी झाले होते लग्न

नगरपालिका निवडणुकीत (municipal election) दुधागरा यांनी वार्ड तीन सारथाना-सिमाडा (Sarathana-Simada) मधील भाजप उमेदवाराचा (BJP candidate) पराभव केला होता.
त्यांना 54 हजार 754 मते मिळाली होती. त्या म्हणाल्या, माझ्याकडे कोणताही राजकीय अनुभव (Political experience) नव्हता.
मात्र, मी आपसोबत (AAP) कल्याणकारी कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी मला नगपालिका निवडणुकीत तिकीट दिले आणि मी सर्वाधिक मताने निवडून आले.
तसेच आपले लग्न गेल्या तीन वर्षापूर्वी कॉम्प्युटर इंजिनिअर (Computer engineer) चिराग सोबत झाले होते. या दांपत्याला अद्याप मूल नाही.

भाजपमध्ये येण्यासाठी टाकत होता दबाव

रुता यांनी सांगिलले की, माझे आणि पती चिरागमध्ये मागील एक वर्षापेक्षा अधिक काळापासून मतभेद होते. परंतु आम्ही अ‍ॅडजेस्ट करत होतो.
मात्र, मी विजयी झाल्यानंतर काही आठवड्यांनी माझ्या पतीने मी भाजपमध्ये सामील (Join) व्हावे यासाठी दबाव (Pressure) टाकण्यास सुरुवात केली.
यासाठी त्यांना कोट्यावधींचा प्रस्तावही भेटला असेल. परंतु मी आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) सोडली नाही.

पतीकडून मारहाण

याच वादातून एप्रिलमध्ये चिराग यांनी मला मारहाण (Beating) केली होती.
यानंतर मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ते अद्यापही मला धमक्या (Threats) देत आहेत आणि त्यांनी माझे महत्त्वाचे दस्तऐवजही परत केलेले नाहीत.
त्यामुळे आता मी कायदेशीर पर्याय शोधत आहे, असे रुता यांनी सांगितले.

Web Title : Ruta Dudhagra | gujarat surat councillor political differences divide husband

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update