Rutuja Varhade News | अभिमानास्पद ! NDA परीक्षेत पुण्यातील ऋतुजा वऱ्हाडे मुलींमध्ये देशात प्रथम; 90 जागांसाठी सुमारे दीड लाख मुलींमध्ये होती स्पर्धा

Rutuja Varhade News | Proud! Pune's Rutuja Varhade ranks first among girls in the country in the NDA exam; Around 1.5 lakh girls competed for 90 seats

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Rutuja Varhade News | राष्ट्रीय संरक्षण अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत पुण्यातील ऋतुजा वऱ्हाडे हिने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. ऑल इंडिया रैंक ३ मिळवत तिने नवा इतिहास रचला आहे. ऋतुजाने या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करण्यासाठी दोन वर्ष कठोर परिश्रम घेतले. तिचे वडील संदीप वऱ्हाडे हे वेब डिझाइन प्राध्यापक असून, आई जयश्री वऱ्हाडे या गणिताच्या शिक्षिका आहेत. या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे दरवाजे मुलींसाठी उघडले तेव्हाच ऋतुजाने या क्षेत्रात झेप घेण्याचा निश्चय केला होता. जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तिने हे यश मिळविले आहे. एनडीए प्रवेश परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. केवळ ९० जागांसाठी सुमारे दीड लाख मुली रिंगणात उतरल्या होत्या. त्यात आपले वेगळेपण सिद्ध करत ऋतुजाने देशात अव्वल स्थान मिळविले.

Total
0
Shares
Related Posts