Ruturaj Gaikwad Wedding | मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाडच्या घरी लगीन घाई; मेहेंदीचे फोटो व्हायरल

पुणे : पोलीसनाम ऑनलाइन – Ruturaj Gaikwad Wedding | भारताचा तरुण क्रिकेटर आणि चेन्नई सुपर किंग्सचा Chennai Super Kings (CSK) स्टार प्लेअर मराठमोळा ऋतुराज गायकवाड हा लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. पुण्यातील (Pune) त्याच्या राहत्या घरात लग्नाची जोरदार तयारी चालू असून आनंदमय वातावरण आहे. 3 जूनला ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा विवाहसोहळा (Ruturaj Gaikwad Wedding) पार पडणार आहे.

Advt.

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या विजयानंतर मैदानावर ऋतुराज उत्कर्षासोबत फिरताना दिसला. त्या दोघांचा महेंद्रसिंग धोनी सोबतचा फोटो देखील खूप व्हायरल झाला होता. या दरम्यान त्याने लग्नाची घोषणा केली. ऋतुराजची होणारी बायको उत्कर्षा पवार (Utkarsha Pawar) ही देखील एक क्रिकेटपटू आहे. तिचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ रोजी झाल असून ती २४ वर्षांची आहे. उत्कर्षा आणि ऋतुराज यांची जुनी मैत्री आहे. आता या मैत्रीचे रूपांतर जोडीदाराच्या (Ruturaj Gaikwad’s Wife) रुपात होणार आहे.

लग्नाची तारीख जवळ आल्याने ऋतुराजच्या घरी लग्नाआधीचे (Ruturaj Gaikwad Wedding) विधी करण्यास सुरूवात झाली. नुकताच ऋतुराज व उत्कर्षाचा मेहेंदी सोहळा (Mehendi Ceremony) पार पडला. त्यांच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहे. ऋतुराजने हातावर उत्कर्षाच्या नावाची मेहेंदी काढल्याचे फोटोत दिसत आहे. ऋतुराज व उत्कर्ष दोघेही क्रिकेट (Cricket) खेळत असल्याने त्यांची मेहेंदी देखील क्रिकेट थीमची आहे. ऋतुराजच्या एका हातावर लग्नाची तारीख काढण्यात आली आहे. तर दुसऱ्या हातावर दोघांच्याही नावाचे इंग्रजीतील पहिले अक्षर घेऊन बॅट व बॉलचं उत्कृष्ट डिझाइन काढण्यात आलं आहे. ऋतुराजच्या या मेहेंदीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या आधी ऋतुराज गायकवाडचे नाव मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Actress Sayali Sanjeev) सोबत जोडले होते.
सोशल मीडियावर त्यांना अनेकदा ट्रोल देखील केले जात होते.
आता मात्र ऋतुराजचे लग्न होत असल्याने या चर्चेली पूर्णविराम बसला आहे.
सायलीने ही ऋतुराजच्या धोनी सोबतच्या (M. S. Dhoni) फोटोवर अभिनंदनाची कमेंट केली आहे.

Web Title :  Ruturaj Gaikwad Wedding | ruturaj gaikwad wedding utkarsha pawar mehendi ceremony photos viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा नितेश राणेंवर ‘प्रहार’

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा