S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! हेज् अँड सॅचे्, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ उपांत्य फेरीत

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20 Leagu) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत हेज् अँड सॅचे् आणि हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. (S. Balan Cup T20 League)

 

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आदित्य रावत याच्या ६७ धावांच्या खेळीच्या जोरावर हेज् अँड सॅचे् संघाने साईदिप हिरोज् संघावर अखेरच्या षटकामध्ये निसटता विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना साईदिप हिरोज्ने १२८ धावांचे आाहान उभेे केले. यामध्ये आयुष वर्तक (२९ धावा), भार्गव पाटील (२५ धावा) आणि दिपक जैस्वाल (२० धावा) यांनी धावांचे योगदान दिले. हे आव्हान हेज् अँड सॅचे् संघाने १९.५ षटकात व ९ गडी गमावून पूर्ण केले. आदित्य रावत ४६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावांची खेळी केली. प्रसन्न वर्तक (नाबाद १३ धावा) आणि शानवाझ शेख (१२ धावा) यांनी निर्णायक क्षणी फटकेबाजी करून संघाचा विजय साकार केला. (S. Balan Cup T20 League)

 

संदीप शिंदे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने गतविजेत्या एमईएस क्रिकेट क्लबचा १३ धावांनी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला आणि उपांत्य फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने संदीप शिंदे (४० धावा), राजवर्धन उंड्रे (२६ धावा) आणि सचिन राठोड (२२ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १३३ धावा धावफलकावर लावल्या. हेमंत पाटील संघाच्या गोलंदाजांच्या कामगिरीमुळे एमईएस संघासाठी हे आव्हान कठीण बनत गेले. एमईएस क्रिकेट क्लबकडून यश चौहान (३६ धावा), जय पांडे (२२ धावा) आणि प्रतिक पोखरनिकर (२२ धावा) यांनी प्रतिकार केला. पण संघाचा डाव १२० धावांवर मर्यादित राहीला. सचिन राठोड याने १९ धावात ४ तर, संदीप शिंदे याने १८ धावात ३ गडी टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्यपुर्व फेरीः

 

साईदिप हिरोज्ः २० षटकात १० गडी बाद १२८ धावा (आयुष वर्तक २९, भार्गव पाटील २५, दिपक जैस्वाल २०, आदित्य रावत ३-१९) पराभूत वि. हेज् अँड सॅचे्ः १९.५ षटकात ९ गडी बाद १३० धावा (आदित्य रावत ६७ (४६, ७ चौकार, ४ षटकार), प्रसन्न वर्तक नाबाद १३, शानवाझ शेख १२, भरत पुरीहत ३-१४, अमन मणियार २-३०, अजित यादव २-३२); सामनावीरः आदित्य रावत; (S. Balan Cup T20 League)

 

हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १३३ धावा (संदीप शिंदे ४० (२३, ५ चौकार, २ षटकार), राजवर्धन उंड्रे २६, सचिन राठोड २२, सुशिल बुर्ले ३-२१, सागर मुळे २-४) वि.वि. एमईएस क्रिकेट क्लबः १९.१ षटकात १० गडी बाद १२० धावा (यश चौहान ३६, जय पांडे २२, प्रतिक पोखरनिकर २२, सचिन राठोड ४-१९, संदीप शिंदे ३-१८); सामनावीरः संदीप शिंदे;

 

Web Title :- S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket
Tournament! Hayes & Sache, Hemant Patil Cricket Academy team in semi-final


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

MNS MLA Raju Patil | ‘नशीबाने तुम्हाला हत्ती दिले, तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका’,
मनसे आमदार राजू पाटलांचा खा. श्रीकांत शिंदेंना टोला

Maharashtra Politics News | जर शिंदे-ठाकरे एकत्र येण्यासाठी चंद्रकांत पाटील पुढाकार घेतला तर…, जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य