S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, पुणे पोलिस संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20 League) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत पुनित बालन ग्रुप आणि पुणे पोलिस (Pune Police Team) या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. (S. Balan Cup T20 League)

 

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत परिक्षीत याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे पोलिस संघाने हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ६१ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे पोलिस संघाने १९७ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये राहूल देसाई याने ६० धावा तर, परिक्षीत (४३ धावा), करण शहा (२५ धावा) आणि अवधुत दांडेकर (२५ धावा) यांनी संघाला १९७ धावा गाठून दिल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १३६ धावा संपुष्टात आला. यश डी. (३-२१), परिक्षीत (२-२९) आणि अमोल पायगुडे (२-२१) यांची अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.

 

पुनित बालन ग्रुप संघाने हेज् अँड सॅचेज् संघाचा पराभव करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुप संघाने १५२ धावा धावफलकावर लावल्या. दिग्विजय जाधव (४९ धावा), सिध्दार्थ म्हात्रे (३२ धावा) आणि ओंकार खाटपे (२५ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. पुणे पोलिसच्या अश्‍विन शुक्ला (४-२७) आणि हितेश वाळुंज (२-१८) यांनी अचूक गोलंदाजी केली. या आव्हाना समोर हेज् अँड सॅचेज् संघाचा डाव ९१ धावांवर मर्यादित राहीला. (S. Balan Cup T20 League)

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
पुणे पोलिसः २० षटकात ९ गडी बाद १९७ धावा (राहूल देसाई ६० (३०, ४ चौकार, ५ षटकार), परिक्षीत ४३, करण शहा २५, अवधुत दांडेकर २५, आकाश बेनाली ३-४६, शिवम पटेल २-५२) वि.वि. हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १६.५ षटकात १० गडी बाद १३६ धावा (साहील कड २६, संदीप शिंदे २६, यश डी. ३-२१, परिक्षीत २-२९, अमोल पायगुडे २-२१); सामनावीरः परिक्षीत;

 

पुनित बालन ग्रुपः १९.४ षटकात १० गडी बाद १५२ धावा (दिग्विजय जाधव ४९, सिध्दार्थ म्हात्रे ३२, ओंकार खाटपे २५, अश्‍विन शुक्ला ४-२७, हितेश वाळुंज २-१८) वि.वि. हेज् अँड सॅचेज्ः १० षटकात १० गडी बाद ९१ धावा (आदित्य रावत १२, सचिन भोसले ४-११);

 

Web Title :- S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament; Punit Balan Group, Pune Police teams fight for the title!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | मुंढव्यात 27 वर्षीय सॉफ्टवेअर डेव्हलपर तरूणीचा विनयभंग, तरूणाने नग्न अवस्थेत केलं घृणास्पद कृत्य

NCP Chief Sharad Pawar | ‘मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता वापरावी, मात्र…’, शरद पवारांची राज्य सरकारवर टीकास्त्र

Maharashtra Politics News | ‘चहापेक्षा किटली गरम असेल तर असेच धंदे…’, शिंदे गटाच्या मंत्र्याचा उद्धव ठाकरेंवर घणाघात