S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाची विजयी सलामी !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20 League) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने (Punit Balan Group Team) औरंगाबादच्या व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा (Vision Cricket Academy ) ७ गडी राखून पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी करत शानदार सलामी दिली. (S. Balan Cup T20 League)

 

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर (Shinde High School Ground, Sahakarnagar) सुरू असलेल्या या स्पर्धेत यश खळदकर याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आणि फलंदाजांच्या तडाखेबंद कामगिरीच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने स्पर्धेत विजयाने श्रीगणेशा केला. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघाची सुरूवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच षटकात सलामीवीर ओंकार येवले झेलबाद झाला. दुसर्‍याच षटकात अभिजीत भगत बाद झाल्याने संघाची २ बाद २ धावा अशी झाली. पण त्यानंतर फलंदाजीस आलेल्या सौरभ थोरात याने ४७ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आर्दश शुक्ला याने १४ धावांची खेळी केली. यश खळदकर याने १९ धावात ३ गडी बाद करून व्हिजन संघाच्या डावाला खिंडार पाडले. उमर शहा यानेही अचूक गोलंदाजी (२-२८) करून संघाची पकड मजबूत केली. व्हिजन संघाला २० षटकात ११७ धावा धावफलकावर लावता आल्या.

पुनित बालन ग्रुप संघाने हे आव्हान ८.४ षटकात व ३ गडी गमावून सहज पूर्ण केले. सलामी फलंदाज ओंकार खाटपे याने २४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. धीरज फटांगरे याने २० धावांचे योगदान दिले. ओंकार आणि धीरज या दोघांनी ३२ चेंडूत ७३ धावांची स्फोटक भागिदारी करून संघाला सुरेख सलामी मिळवून दिली. ‘पॉवर प्ले’चा उत्तम उपयोग करून दोघांनी संघाचा विजय सोपा केला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी, औरंगाबादः २० षटकात ८ गडी बाद ११७ धावा (सौरभ थोरात ४७, आर्दश शुक्ला १४, यश खळदकर ३-१९, उमर शहा २-२८) पराभूत वि. पुनित बालन ग्रुपः ८.४ षटकात ३ गडी बाद १२० धावा (ओंकार खाटपे ५४ (२४, ५ चौकार, ५ षटकार), धीरज फटांगरे २०, सौरभ अडलक २-८); (भागिदारीः पहिल्या गड्यासाठी धीरज आणि ओंकार यांच्यात ७३ (३२); सामनावीरः यश खळदकर.

 

Web Title :- S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament; Punit Balan Group team’s winning salute !!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश