S. Jaishankar | युद्धात भारत कोणाच्या बाजूने?, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एस. जयशंकर यांनी दिले ‘हे’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – S. Jaishankar | संयुक्त राष्ट्राच्या महासभेत रशिया-युक्रेन युद्धावर (Russia-Ukraine War) भारताने (India) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हे युद्ध मुत्सदेगिरीद्वारे संपवण्यात यावे, असे आवाहन या महासभेत भारताकडून करण्यात आले आहे. “या युद्धात भारत कोणाच्या बाजूने आहे हे आम्हाला नेहमी विचारले जाते. यावर आमचे थेट आणि प्रामाणिक एकच उत्तर आहे. भारत शांतीच्या बाजूने असून यावर नेहमी ठाम राहणार आहे”, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी या महासभेत सांगितले आहे.

 

तसेच रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. या प्रश्नावर संयुक्त राष्ट्र आणि बाहेरील देशांमध्ये रचनात्मक कार्य आवश्यक असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. या महासभेत बोलण्यापूर्वी एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जे लावरोव (Sergey Lavrov) यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी युक्रेन, जी-20 आणि संयुक्त राष्ट्रामधील सुधारणेवर चर्चा केली.

 

या भाषणावेळी त्यांनी भारताने अलीकडच्या काही वर्षांत अफगाणिस्तान (Afghanistan), म्यानमार (Myanmar), श्रीलंका (Sri Lanka), येमेन आणि अन्य देशांना अन्नधान्याचा पुरवठा केल्याचे यावेळी नमूद केले.
यावेळी एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी चीनवरदेखील अप्रत्यक्ष निशाणा साधला.
पाकिस्तानस्थित (Pakistan) लष्कर-ए-तोयबाचा (Lashkar-e-Taiba) दहशतवादी साजिद मीर (Terrorist Sajid Mir)
याला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याचा अमेरिका (America) आणि भारताचा प्रस्ताव चीनकडून रोखण्यात आला होता.
याच मुद्द्यावरून जयशंकर यांनी चीनवर (China) टीका केली.

 

Web Title :- S. Jaishankar | minister of external affairs s jayshankar commented on russia ukraine war and diplomacy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | खडकीत पूर्व वैमनस्यातून दोन गटात राडा; चाकूने परस्परावर वार, 11 जणांना अटक

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा