PoK लवकरच भारताचा भाग असेल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने नुकतेच आपल्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण केले. याबाबतची माहिती अनेकदा आपण वाचली आहे मात्र आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला धडकी भरवणारे विधान केले आहे.काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानची आगपाखड झाली होती.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणतात की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. तर कलम ३७० हा द्विपक्षीय मुद्दा नसून अंतर्गत मुद्दा आहे.भारताने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर देशातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. केंद्रिय मंत्री जितेंद्र सिह यांनी सुद्धा म्हंटले होते की, आता POK बाबतच निर्णय होणार आहे. मोदींच्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर जितेंद्र सिह बोलताना म्हणाले होते की, आता पाकिस्तानात असलेले काश्मिरसुद्धा भारत परत मिळवणार आहे.

सरकारच्या 100 दिवसांच्यानिमित्त पत्रकार परिषदेत कलम ३७० वर बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, ही भारताची अंतर्गत बाब आहे. पाकिस्तानकडे 370 चा मुद्दा नाही. त्याच्यासमवेत दहशतवादाचा मुद्दा आहे.

सार्क विषयी बोलताना ते म्हणाले की सार्क प्रादेशिक मुद्द्यांविषयी आहे. व्यवसाय, कनेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दहशतवादाची आवश्यकता नाही. कोणता देश सार्कला प्रोत्साहन देतो आणि कोणता देश दहशतवादाला प्रोत्साहन देतो हे सदस्यांनी ठरवायचे आहे.